नाशिक : नाशिकच्या एका नामांकित महाविद्यालयातील मुली पुन्हा एकदा भिडल्याचे समोर आले आहे. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वीही नाशिकच्या गंगापूर रोड येथील महाविद्यालयातील तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. अगदी तसाच प्रकार नाशिक-पुणे महामार्गावरील एका महाविद्यालयाच्या समोर घडला आहे. दोन तरुणींमध्ये यावेळी फ्री-स्टाईल हाणामारी झाली आहे. एकमेकींचे केस ओढत एकमेकींना मारहाण करत होत्या. हाणामारी सुरू असतांना इतर महाविद्यालयीन तरुणांनी मारहाण पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उपस्थित काही तरुणांनी हाणामारीचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये कैद करून तो व्हायरल केला आहे.
महाविद्यालयाच्या बाहेर भररस्त्यात दोन तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
यापूर्वीही नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका नामांकित महाविद्यालयातील फ्री-स्टाईल हाणामारी झाली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुण-तरुणी हाणामारी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातील काही विद्यार्थ्यानी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नाशिकमध्ये पुन्हा मुलींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी #viralvideo #nashik #college #girlsfight pic.twitter.com/y6bSmIWKAC
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) February 4, 2023
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन्ही मुली एकमेकांच्या झिंज्या उपटत आहे. एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे.
व्हिडिओ एक विशेष बाब म्हणजे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणीलाही धक्काबुक्की केली आहे. दोन्ही महाविद्यालयीन तरुणी त्यांच्या ड्रेसवरुन एकाच महाविद्यालयातील असल्याचे दिसून येत आहे.
दोन तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारी कशावरून झाली? कोणत्या गोष्टीवरून वाद झाला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही, मात्र सोशल मीडियावरील हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.