मुंबई : एसटीचा प्रवास ( ST ) म्हटला की विश्वासाची सेवा असे म्हटले जाते. अन्य वाहनांच्या तुलनेत एसटीच्या ( MSRTC ) अपघाताचा रेशो एकदमच कमी आहे, त्यामुळे अशा विनाअपघात सेवा बजावलेल्या एसटीच्या ड्रायव्हर मंडळींचा 26 जानेवारीच्या गणतंत्र दिनी खास गौरव ( felicitated ) होणार आहे. एसटी महामंडळाच्या तब्बल 780 चालकांची ( DRIVER ) त्यासाठी निवड झाली आहे. 25 वर्षे किंवा जास्त कालावधीपेक्षा जास्त कोणताही अपघात न करता एसटीची सेवा केलेल्यांचा त्यात समावेश आहे.
एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. एसटीला ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटले जात असून या सार्वजनिक परीवहन सेवेचा अपघाताचा दर इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. दर एक लाख किलोमीटरला एसटी चालकाच्या अपघाताचे प्रमाण 0.17 टक्के इतके कमी आहे. समोरच्या वाहनाची चुकीचे प्रमाण 90 टक्के इतके आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत खूपच सुरक्षित मानला जात असतो.
सत्कारमूर्तींमध्ये 2012 आणि 31 डिसेंबर 2020 पर्यंत 25 वर्षे पेक्षा त्यापेक्षा अधिक सेवा बजावलेल्यांचा समावेश आहे. खालील चालकांची निवड झाली आहे. लालपरीची विनाअपघात सेवा बजावलेल्या 780 चालकांमध्ये औरंगाबादच्या 28 तर बीडच्या 15, जालनाच्या 15, लातूर विभागाच्या 52, नांदेड विभागाच्या 17, उस्मानाबादच्या 23, पमुंबई विभागाच्या 9, पालघर विभागाच्या 13, रायगड विभागाच्या 19, रत्नागिरी विभागाच्या 20, सिंधुदुर्ग विभागाच्या12, ठाणे विभागाच्या 11, नागपूर विभागाच्या 32, भंडारा विभागाच्या 16, चंद्रपूर विभागाच्या 11, गडचिरोलीच्या 8, पुण्याच्या 41 , कोल्हापूरच्या 31, सांगलीच्या 30, साताराच्या 39, सोलापूरच्या 56, नाशिकच्या 32, धुळे विभागाच्या 26, अहमदनगरच्या 23, अकोलाच्या 39, अमरावतीच्या 43, यवतमाळच्या 32, बुलडाणाच्या 72,वर्ध्याच्या दोन, सचिवीय शाखेच्या तीन, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी आणि परभणीच्या प्रत्येकी एका चालकाचा समावेश आहे.