साडेतीन वर्षाच्या मुलाच्या पोटात खिळा गेला आणि पालकांची धांदल उडाली, डॉक्टर म्हणाले…

| Updated on: Apr 02, 2023 | 2:23 PM

नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा या गावाच्या गणेश येलमिटवार या साडेतीन वर्षाच्या मुलाने अंगणात खेळत असताना लोखंडी खिळा गिळला.

साडेतीन वर्षाच्या मुलाच्या पोटात खिळा गेला आणि पालकांची धांदल उडाली, डॉक्टर म्हणाले...
doctor
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नांदेड : चिमुकल्याला (CHILD) पालक (PARENT) अधिक जपत असतात, त्याला लहान असताना घरातील प्रत्येक गोष्टीची ओळख करुन दिली जाते. ज्या गोष्टी ज्वलंत आहेत, किंवा ज्या गोष्टीमुळे त्रास होणार आहे गोष्टीची मुलं लहान असताना त्याला कल्पना दिली जाते. चिमुकल्यांच्या हातात खेळणी सुध्दा त्याच्या तोंडात जाणार नाही अशा पद्धतीची दिली जातात. नांदेडमध्ये साडेतीन वर्षाचा मुलगा खेळत असताना त्याने खिळा गिळला. त्याच्या पोटात दुखू लागल्यानंतर त्याच्या आईला शंका आली. आईने तात्काळा डॉक्टरांकडे गेली झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी (DOCTOR) प्रयत्न करु असं आश्वासन दिलं.

नेमकं काय झालं

एका साडेतीन वर्षाच्या मुलाच्या पोटातून खिळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा या गावाच्या गणेश येलमिटवार या साडेतीन वर्षाच्या मुलाने अंगणात खेळत असताना लोखंडी खिळा गिळला. ही गोष्ट त्याच्या आईला लक्षात आली. गणेशला उलट्या होत असल्याने नायगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्याच्या पोटात साडेपाच सेंटिमीटर लांबीचा खिळा असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ गणेशला नांदेडच्या पोटविकर तज्ञ डॉ.कैलास कोल्हे यांच्याकडे रेफर करण्यात आले. डॉ आश्विन करे आणि डॉ.पंकज राठी यांच्या मदतीने डॉ कैलास कोल्हे यांनी तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर गणेशच्या पोटातून लोखंडी खिळा बाहेर काढला. खिळा काढण्यासाठी गणेश वर कुठलीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. येंडोस्कोपीद्वारे हा खिळा गणेशच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.गणेशला कुठलीही जखम झाली नाही.आता गणेश ची प्रकृती ठणठणीत आहे. अशा घटना टाळायच्या असतील तर पालकांनी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन डॉ कैलास कोल्हे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत मुलांचे असे किस्से घडले आहेत. अनेक मुलांनी तोंडात पैसे घातले आहेत. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पण सध्या डॉक्टरांकडे नवी टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्यांना लहान मुलांनी गिळलेल्या वस्तू बाहेर काढणे सोपे झाले आहे. लहान मुलं आजही खेळताना कानात एखादी वस्तू घालणे, किंवा तोंडात एखादी चघळणे असं करीत असतात.