नाशिक : नाशिक मधील बिबट्याची ( Leopard ) दहशत काही केल्या कमी होत नाहीये. कुठल्या ना कुठल्या भागात बिबट्या नागरिकांना आढळतो, कुठेतरी बिबट्याकडून हल्ला होतो अशा घटना सर्रासपणे घडत आहे. मात्र, आता बिबट्याच्या रडारवर पशुधन असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या (Farmer ) जनावरांवर बिबट्याचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. ओझर येथील चव्हाण मळ्यात बिबट्याने एका अडीच वर्षीय वासरीला ठार केले आहे. बिबट्याचा वावर नेहमी असल्याने परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र, वनविभागाने दुर्लक्ष केल्याने हल्ल्याची घटना घडल्याचा आरोप करत नागरिक संताप व्यक्त करत आहे.
या घटनेने जनावरे सुद्धा धास्तावले असून त्यांचा थरकाप होऊ लागला आहे. काही जनावरे तर चाराही खात नाही. एकूणच नागरिकांबरोबर पशुधनही धास्तावले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करा नाहीतर आम्ही बंदोबस्त करतो असे म्हणत नागरिक आक्रमक झाले आहे.
जाणोरी रोड येथे एकनाथ चव्हाण यांचा गोठा आहे. गोठ्यात अडीच वर्षाची वासरी होती. जवळून जात असलेल्या बिबट्याने थेट अडीच वर्षाच्या वासरीवर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात वासरी मृत पावली. त्यानंतर हा संपूर्ण हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी 70 हून अधिक जनावरे तिथेच होती.
जंगली प्राण्यांचा हल्ला पाहून जनावरे धास्तावली आहे. या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा आता इथे वारंवार हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकदा बिबट्याचे निदर्शनास जनावरे असल्याच्या निदर्शनास असल्याने त्याचा वावर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी वनविभागाला माहिती कळविण्यात आली असली तरी अद्यापही पिंजरा लावण्यात आलेला नाही. बिबट्या इतर ठिकाणी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.
ज्या ठिकाणी अडीच वर्षाच्या वासरी वर हल्ला झाला त्या ठिकाणी 44 म्हैस, 30 गाई आणि 25 बकऱ्या आहेत. त्यामुळे बिबटया पुन्हा परतला तर आणि पशुधन ठार करू शकतो अशी शंका नागरिक घेत आहे. एकूणच बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
अशाच घटना वारंवार घडत राहिल्या तर कुणीही पशुधन सांभाळनार नाही ना पशुधनाचा व्यवसाय करेल. त्यामुळे बिबट्याचा वेळीच बंदोबस्त केला नाहीतर पशूधन धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात असून वनविभाग काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.