दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर : 2 तारखेपासून दहावीची परीक्षा ( Exam ) सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील ही परीक्षा जरा कठीण असते. बोर्डची परीक्षा ( Board Exam ) असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात काहीशी भीती असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेची जोरदार तयारी करत असतात. वर्षभर केलेल्या अभ्यासातून परीक्षा सोपी जाईल असा त्यांचा कयास असतो. मात्र, दुसरीकडे असेही काही विद्यार्थी असतात जे परीक्षेला जाण्यापूर्वी देवदर्शन करत असतात. चांगला पेपर जाऊदे म्हणून काही विद्यार्थी नवस करतात, नारळही फोडतात. असाच काहीसा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी पेपरला जाण्यापूर्वी सर्व नोटपॅड एकत्र ठेऊन त्याच्यापुढे दगड ठेवला आणि तिथे नारळ फोडला आहे. बोल भवानी की जय म्हणत पेपरला जाण्यापूर्वी नारळ फोडलेली ही क्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
दहावीच्या पेपरला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नारळ फोडून सुरवात केली याचा व्हिडिओ उपस्थित विद्यार्थ्यांनी चित्रित केला. नंतर हाच व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत विद्यार्थ्यांचा नादच खुळा या आशयाखाली चर्चेचा विषय ठरत आहे. विविध प्रकारच्या त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
या संपूर्ण प्रकार छत्रपती संभाजी नगरच्या लासुर स्टेशन येथील विद्यार्थ्यांचा असल्याची माहिती समोर येत आहे. कुठलेही शुभकार्य करण्यासाठी नारळ फोडला जातो. हिंदू धर्मात तशी एक रीत आहे. त्याचनुसार विद्यार्थ्यांनी पेपरला जाण्यापूर्वी नारळ फोडला आहे. यावेळी बोल भवानी की जय चा जयघोष करत नारळ फोडले आहे.
नारळ फोडण्याच्या पूर्वी या विद्यार्थ्यानी विशेष बाब म्हणजे सर्व नोटपॅड समोर ठेऊन त्याच्या समोर एक दगड ठेवला आणि नंतर नारळ फोडला त्यामुळे हा विषय सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला असून व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. 2 मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.
परीक्षेला जाण्यापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यानी केलेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहे. #10thpass #viralvideo #chhatrapatisambhajinagar pic.twitter.com/omSczp2T2D
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 3, 2023
छत्रपती संभाजीनगरच्या लासुर स्टेशन परिसरातील विद्यार्थी या निमित्ताने चर्चेचा विषय ठरत असले तरी नारळ फोडून पेपर चांगला जातो ही धारणा त्यांच्या मनात असल्याची चर्चा एका बाजूला आहे. तर दुसऱ्या बाजूला असे नारळ फोडून पेपर चांगले गेले तर वारंवार नापास होणाऱ्यांनी नारळ फोडले नसते का ? अशीही चर्चा उलट सुलट यानिमित्ताने होत आहे.
दहावीचे विद्यार्थी म्हंटलं की त्यांची खडतर परीक्षेची पहिली पायरी म्हणजे दहावीची बोर्डची परीक्षा असते. त्यामुळे हीच खडतर परीक्षा आणि त्या परीक्षेला जाण्यापूर्वी नारळ फोडून केलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.