पंढरपूरवरुन येताना भीषण अपघात, विहिरीत जीप कोसळून 7 भाविक ठार, सहा जखमी

| Updated on: Jul 18, 2024 | 8:53 PM

जालना येथे पंढरपूरवरुन परत असलेल्या एका जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप थेट शेतातील विहीरीतच गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची विहीरीतील पाणी उपसून आणखी कोणी आत बुडाले आहे का याचा शोध घेतला जात आहे.

पंढरपूरवरुन येताना भीषण अपघात, विहिरीत जीप कोसळून 7 भाविक ठार, सहा जखमी
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जालना ते राजूर मार्गावर भरधाव काळ्या-पिवळ्या जीपचा आणि दूचाकीची धडक होऊन जीपच्या चालकाचे नियंत्रण चुकल्याने जीप थेट विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या गंभीर अपघातात सात भाविक ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या जीपमध्ये एकूण 13 प्रवासी भाविक दाटीवाटीने बसले होते अशी माहिती उघडकीस आली आहे.

जालना ते राजूर मार्गावर तुपेवाडी जवळ हा अपघात घडला आहे. खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर ( राजूर जवळील ) येथे दुचाकी आणि काळी पिवळीचा हा अपघात झाला. चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याने त्यातील 13 जण जखमी झाले आहेत. या विहिरीतून सात भाविकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत तर सहा जण गंभीर जखमी असून त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नेगावचे काही भाविक पंढरपूर येथून बसने जालना येथे आले होते. जालना येथून काळी पिवळी जीप करुन ते राजूरकडे घरी जात होते. जालना राजूर रोडवरील वसंतनगर पाटी जवळ तुपेवाडी शिवारात हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर जालन्यातली चंदनझिरा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीत बुडालेल्या या जीपमधील नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले. सहा जणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

दुचाकीला वाचविता अपघात

जालना राजूर रोडवर वसंतनगर काळी पिवळी जीप दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्न करताना रोड लगत असलेल्या पाण्याने तु़डुंब भरलेल्या विहिरीत पडली आणि या अपघातात 6 भाविकांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले असले तरी ते गंभीर जखमी झाले आहेत. यातील काहीजण पंढरपूरहून घरी परतत होते. जखमींना जालना येथे उपचारसाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन पथकाने या विहिरीचे पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे.