सांगली : मिरजेतील बँक ऑफ बडोदाची 16 कोटी 97 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी दोन वर्षानंतर आरोपीला अटक (Arrest) करण्यास पोलिसांना अटक केली आहे. अजित नारायण जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सीएनएक्स कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबईतील विभागीय व्यवस्थापक असून विश्रामबाग येथील रहिवासी आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखे (Economic Offenses Branch)च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मुंबईतील श्री एन एक्स कॉर्पोरेशन कंपनीचे मिरज तासगाव रोडवर कोल्ड स्टोरेज होते. या कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाणा हळदीचा साठा करण्यात आला होता. हा शेतीमाल बडोदा बँकेकडे तारण ठेवून शेतकऱ्यांच्या नावे 16 कोटी 97 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते.
कर्जाची परतफेड केल्याशिवाय शेतीमालाची विक्री न करण्याचा करारही बँकेने केला होता. मार्च 2017, 3 नोव्हेंबर 2020 दरम्यान कोल्ड स्टोरेजमधील शेतीमाल बँकेच्या परवानगी विना परस्पर विकण्यात आला.
ठेवलेल्या बेदाण्याची विक्री करण्यात आल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे बँक ऑफ बडोदाकडून मुंबईच्या सीएमएक्स कॉर्पोरेशन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह विभागीय व्यवस्थापक आणि काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून एरिया व्यवस्थापक अजित जाधव याचा शोध सुरू होता. अखेर आज त्याला अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. (Accused of defrauding Baroda Bank of 16 crores 97 lakhs arrested in Sangli)