मुंबई : आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचाराताच आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून एकप्रकारे दंडच थोपटले आहे. आम्ही तर निवडणुकीची वाटच पाहत आहे. पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आहे की चाळीस आमदार आणि 13 खासदार यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे. सिनेट ठीक आहे पण त्यांनी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात पण त्यांच्यात हिंमत नाहीये. म्हणून हे चालू आहे. नवीन वर्षात तरी या सरकारने हिंमत दाखवावी. चाळीस गद्दारांच्या जागी 13 गद्दार खासदारांच्या जागी आणि महापालिकेच्या ठिकाणी निवडणूक घेण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे. राज्यात दोन सीएम आहेत. एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम ते राज्यासाठी कधीच जात नाही ते स्वतःसाठी जातात असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या निवडणुका या लांबणीवर पडलेल्या आहे. त्यातच शिवसेनेत पडलेल्या फुटीवरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदार, खासदार यांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदार आणि खासदार यांना पुन्हा गद्दार म्हणून उल्लेख करत निवडणुका घेण्याचे आवाहन दिले आहे. आमदार ऋतुजा लटके यांच्या मतदार संघात एका कार्यक्रमासाठी गेलेले असतांना आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली.
आदित्य ठाकरे हे सिनेत निवडणुकीची तयारी करत असतांना त्या दरम्यान मनसेही निवडणूक लढवत असल्याचा प्रश विचारला होता त्यावर निवडणुकीत बोलू असे म्हंटले आहे.
मात्र यावेळी निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलत असतांना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा गद्दार म्हणून उल्लेख करत निवडणुका घेण्याचे आव्हान दिले आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यापासून निवडणूक लावा आणि जिंकून येऊन दाखवा असं खुलं चॅलेंज देत आहे.