आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींचा हातात हात बघून डोळ्यात पाणी आलं, या नेत्याला काय वाटलं…

| Updated on: Nov 15, 2022 | 5:33 PM

आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींचा हातात हात बघून डोळ्यात पाणी आलं, या नेत्याला काय वाटलं...
राहुल गांधी आदित्य ठाकरे
Image Credit source: tv 9 Marathi
Follow us on

खेड/रत्नागिरीः शिंदे-भाजप गट आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या प्रचंड आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गुवाहाटीवरुन चाललेल्या टिकेला उत्तर देताना शिंदे गटातील आमदारांकडून आरोपांचे समर्थन केले जात नसले तरी त्यावर जोरदार प्रत्यारोपही केला जात आहे. गुवाहटीला हिंदूचे मंदिर आहे आणि गेलं पाहिजे. तिथं मी पण जाईन, मला बोलावलं तर! व देवपूजा केलीच पाहिजे असंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावरही रामदास कदम यांनी निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या आणि राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर चालताना बघून रामदास कदम म्हणाले की, भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या हातात हात घातलेला आदित्य ठाकरे यांना पाहिले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं असा टोलाही त्यांना लगावला.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी 50 खोक्यांवरून टीका करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

यावेळी म्हणाले की, संजय राऊत यांचा अभ्यास अधिक आहे. त्यामुळे ते बोलतात असं म्हणत त्यांनी आता राज्याला विकासाचे खोके हे शिंदे सरकारच देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कोयनेचे पाणी कोकणला दिले तर बेरोजगारी कमी होणार आहे. रोजगारासाठी तरुण बाहेर जाणार नाहीत. त्यामुळे शेती, उद्योग वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी निधीचे आश्वासनही मुख्यमंत्रीनी दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

12 वर्षात मुंबई-गोवा मार्गावर 2 हजार माणसांचे अपघाती निधन झाले आहे. अपघातात माणसं गेली की, त्या रस्त्याच्या ठेकेदाराला फासावर लटकवा असा घणाघातही त्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर केला आहे.

मुख्यमंत्री बोलतात त्या प्रमाणे काम चालू आहे असल्याचे सांगत मुलगा म्हणून योगेशला रामदास कदम यांची शाबासकी मिळाली आहे.

योगेश कदम यांच्या मार्फत विकास उद्योग वाढत आहेत त्याचा अभिमान आपल्याला असल्याचेही रामदास कदम यांनी मत व्यक्त केले.