शिवसेना पक्षांची दोन स्वतंत्र दसरा मेळावे आज मुंबईत झाले. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क येथे साजरा झाला. या दसरा मेळाव्यात यंदा प्रथम युवा नेते आदित्य ठाकरे यांचे भाषण झाले. या भाषणात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. आपण प्रथमच शिवतीर्थाच्या व्यासपीठावरुन बोलत आहोत असे सांगत त्यांनी आपले आजोबा स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आदित्य ठाकरे यांनी माझ्या मागे वडीलांचा, आजोबांचा आणि पणजोबांचा आशीवार्द असल्याचे यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की पहिल्यांदा मी दसरा मेळाव्यात भाषण करत आहे. मनात अनेक आठवणी आहेत. लहानपणी दसरा हा मोठा दिवस होता. आज्याचं भाषण असायचं. बाळासाहेबांचं भाषण ऐकायला इथे समोर बसलो आहे. मग वडिलांचं भाषण ऐकायला बसायचो. २०१० मध्ये याच मेळाव्यात युवा सेनेची स्थापना केली. त्यांनी तलवार हातात दिली आणि लढण्याचं बळ दिलं. आदित्य लढ. मातीसाठी लढ, महाराष्ट्रासाठी लढ असे त्यांनी सांगितल्याचे आदित्य म्हणाले. ते पुढे म्हणाले की मी वडिलांचा शपथविधीही पाहिला. भाषण ऐकली आहे. गेल्या १४ वर्षात मी कधी भाषण केलं नाही. वडील आल्यावर मी थांबणार आहे. माझ्या आजोबाचा आणि पणजोबाचा आशीर्वाद आहे. हा क्षण मोठा आहे. ही सर्वात मोठी लढाई असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की ६ जानेवारी रोजी आम्ही अरविंद सावंत यांचा प्रचार सुरू केला. तेव्हा सांगितलं की, लोकसभेत बदल घडवायचं आहे. ते वर्ष आलं आहे.
परवा एका अधिकाऱ्याने सांगितलं. चर्चा सुरू आहे. आपण सर्व आमदार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. हे सरकार हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहे. महामंडळांची खैरात होत आहे. जोपर्यंत अदानीची सर्व कामे आणि जीआर निघणार नाही तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही. एका अधिकाऱ्यानेच आपल्याला सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हणाले.