मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या एका दिलदारपणाची आणि कृतीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. आदित्य ठाकरे यांची कृती मुंबईत निघालेला महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या दरम्यानची आहे. आदित्य ठाकरे यांचा नेहमीच साधेपणा आणि दिलदारपणा समोर आलेला आहे. आजही असेच काहीसे घडले असून आदित्य ठाकरे यांची कृती चर्चेचा विषय ठरत आहे. खुर्चीचं राजकारण राजकीय मंडळींना किती प्रिय असतं हे सांगायची आवश्यकता नाही. खुर्ची साठी वाट्टेल ते करू शकतात. पण अशीच एक खुर्ची आदित्य ठाकरे यांनी देऊन टाकली आहे. ही खुर्ची होती महामोर्चाच्या व्यासपीठावरील. व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर बसायची संधी मिळावी यासाठी अनेक जण हे प्रयत्न करत असतात. पण आज मुंबईतील महामोर्चाच्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे हे बसलेले होते. त्याच दरम्यान संजय राऊतही आले. पण व्यासपीठावर बसण्यासाठी खुर्च्या खाली नव्हत्या, आणि अशातच संजय राऊत व्यासपीठावर खुर्चीच्या शोधात असतांना आदित्य ठाकरे यांनी आग्रहाने संजय राऊत यांनी दिली आणि स्वतः उभे राहिले.
आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना हात धरून स्वतः बसलेल्या खुर्चीवर बसविले, इतकंच काय बाजूला असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांना आग्रह करत हात धरून आदित्य यांच्या खुर्चीवर बसविले.
आदित्य ठाकरे यांनी मोठेपणा देऊन संजय राऊत यांना दिलेली खुर्ची आणि स्वतः उभे राहिले हा प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे, आदित्य यांचे त्यावरून कौतुक होऊ लागलं आहे.
आदित्य ठाकरे यांना अनेक कार्यक्रमांना बसण्यासाठी पहिल्या रांगेत किंवा महत्वाच्या नेत्यांमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली असते, पण अनेकदा आदित्य ठाकरे यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला बसण्यासाठी स्वतःची जागा दिल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.
आदित्य ठाकरे यांचा दिलदारपणा आणि महामोर्चातील राऊत यांना खुर्ची दिल्याची कृती कौतुकाचा विषय ठरत असून आदित्य ठाकरे यांचे कौतुक होऊ लागले आहे.