परदेशातील उच्च शिक्षण सोडून तरुणी उतरली सरपंच पदाच्या निवडणुकीत, येथील तरुणी आजमावतेय नशीब

| Updated on: Dec 16, 2022 | 8:08 PM

यशोधरा राजे शिंदे ही जॉर्जिया या ठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.

परदेशातील उच्च शिक्षण सोडून तरुणी उतरली सरपंच पदाच्या निवडणुकीत, येथील तरुणी आजमावतेय नशीब
यशोधरा राजे शिंदे
Follow us on

सांगली : गावच्या विकासासाठी परदेशातील उच्च शिक्षण (Higher Education) सोडून एक तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) आखाड्यात उतरली आहे. यशोधरा राजे शिंदे (Yashodhara Raje Shinde) असं या अवघ्या 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी येथे सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सध्या ती आपले नशीब आजमावत आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी सरपंच पदाचे निवडणूक लढवणारे यशोधरा राजे शिंदे ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 21 वय असणारी यशोधरा ही एक उच्चशिक्षित तरुणी आहे. गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी ती थेट परदेशातून परतली आहे.

यशोधरा राजे शिंदे ही जॉर्जिया या ठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. मात्र यशोधरा ही शिक्षण सोडून थेट गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सरपंच पदासाठी यशोधरा राजे हिने उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आहे.

गाव खेड्यातील आजची तरुण पिढी नोकरी शिक्षण व्यवसायाच्या निमित्ताने पुढे शहरात आणि परदेशात जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. असं असताना विदेशातील उच्च शिक्षण सोडून गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन यशोधरा राजे ही गावात परतली. नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी आदर्श ठरत आहेत.

गावातल्या राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. डॉक्टरकीचं शिक्षण अर्धवट सोडून ती संरपंच पदाची निवडणूक लढत आहे. राजकारणात येण्यासाठी तीनं चक्क उच्च शिक्षण सोडलं. त्यामुळं या निवडणुकीत ती कितपत यशस्वी होते, हे पाहावं लागेल.