मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरातही गोवरचा धोका, आरोग्य यंत्रणा आता काय करणार ?

| Updated on: Nov 22, 2022 | 9:05 AM

नाशिक महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागाने आशा, सर्वेक्षण अधिकारी यांच्यामार्फत ही स्थानिक पातळीवर आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरातही गोवरचा धोका, आरोग्य यंत्रणा आता काय करणार ?
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : मुंबई नंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गोवरचे चाळीसहून अधिक रुग्ण आढळले होते, त्यात आता मालेगावनंतर नाशिक शहरात चार गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवरचा धोका वाढलेला असतांना राज्यभर जनजागृती केली जात आहे. अशातच नाशिक शहरात चार संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. रक्ताचे नमुने हे मुंबईला पाठविण्यात आले आहे. गोवरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास संपूर्ण शहरात सर्वेक्षण केले जाणार आहे. गोवरचा धोका वेळीच रोखण्यासाठी नाशिकमध्ये आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. राज्यातील काही मोजक्याच शहरात गोवरचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारून उपाययोजना करत आहे.

मालेगावमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून अनेकांनी यामध्ये लस न घेतल्याने गोवरचे रुग्ण आढळून आल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे.

त्यामध्ये आता नाशिकमधील स्थिती बघता मुंबईवरुण चार संशयितांचे अहवाल कधी येतात याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागून आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागाने आशा, सर्वेक्षण अधिकारी यांच्यामार्फत ही स्थानिक पातळीवर आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गोवरची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्या, असे आवाहन देखील केले जात आहे. ताप, सर्दी आणि खोकला आला तरी त्या बाळाचे निरीक्षण केले जात आहे.

ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाहीत, अशा बालकांचा शोध घेतला जात आहे, त्यांना लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मुंबईतून संशयित बालकांचा अहवाल काय येतो यावर पुढील कार्यवाही अवलंबून असणार आहे.

कोविड काळात अनेक बालकांना लसीकरण देण्यास पालकांनी टाळाटाळ केल्याची चर्चा होती, त्यात गोवरची साथ आल्याने पालकांमध्ये देखील घबराट निर्माण झाली आहे.