अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Ayodhya) यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (After Raj Thackeray announcement Devendra Fadnavis will also go to Ayodhya)
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. मात्र अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी केंद्रीय कृषीराज्यमंत्री कैलास चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विविध प्रश्न विचारले.
राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णांशी गेल्या आठवड्यापासून आमची चर्चा सुरु आहे. आजच्या बैठकीत काही मार्ग निघेल असं आम्हाला वाटतंय. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींवर निर्णय देखील घेण्यात आले आहेत. त्यांनी उपोषणाला बसावं असं कोणालाच वाटत नाही”.
लोकल सेवा टप्याटप्याने सुरु केली पाहिजे. विशेषत: खासगी क्षेत्रातील नोकरवर्गाला ही सेवा नसल्याने खूप त्रास होतो आहे. त्यामुळे त्याच्या टायमिंग संदर्भात विचार केला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
(After Raj Thackeray announcement Devendra Fadnavis will also go to Ayodhya)
मनसेचा मेगाप्लॅन, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा ठरला, निवडणुकीसाठी रणनीती आखली