नागपूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर राज्य सरकारने त्याचा धसका घेतला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज दूसरा दिवस असतांना एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असतांना खबरदारीचा उपाय म्हणून विधीमंडळात प्रवेश करत असतांना शाईपेन घेऊन प्रवेश करता येणार नाहीये. शाईपेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शाईफेकीच्या संदर्भात राज्य सरकारने एकूणच धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी यांनी भीक मागितली होती, सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहिले नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं होतं त्यावरून राज्यभर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात वातावरण तापलेलं होतं. त्यावर पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यावरून तिघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांची जामीनावर सुटका देखील झाली आहे.
सोमवारपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आजचा हिवाळी अधिवेशनाचा दूसरा दिवस असून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधिमंडळ परिसरात शाईपेन किंवा शाईच्या तत्सम वस्तु घेऊन प्रवेश करणाऱ्या व्यक्तीस प्रवेश दिला जात नाही, ती वस्तु ताब्यात घेतली जाते.
मंत्री किंवा इतर कुणावर शाईफेक होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शाईपेनला बंदी घालण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक झाल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद पाहायला मिळाले होते, त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेतला असून सरकारने शाईफेकीचा धसका घेतल्याचे बोलले जात आहे.