नाशिक : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महानगर पालिकेच्या ( Nashik News ) माध्यमातून धोकेदायक वाडे आणि इमारती यांना पालिकेच्या वतिने नोटिसा बजावून सोपस्कार पार पाडले जाते. पावसाळ्यात जीर्ण वाडे किंवा इमारती कोसळतात आणि त्यानंतर मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यात अनेकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे धोकेदायक वाडयांचा प्रश्न पावसाळ्यात नेहमीच उपस्थित होत असतो. त्यामुळे धोकेदायक वाडे ( Old Property ) खाली करावे असे आवाहन पालिकेकडून केले जाते. तरीही अनेक कुटुंब वाडा किंवा धोकदायक इमारतीतून बाहेर पडत नाही. त्यामुळे मोठी हाणी होण्याची शक्यता असते.
अशी सर्व परिस्थिती असतांना नुकताच नाशिकच्या अशोकस्तंभ येथील चांदवडकर वाडा कोसळला होता. एका चारचाकी वाहनाने दुकानाला धडक दिल्यानंतर वाडा कोसळला होता. त्यामुळे जोरदार चर्चा यानिमित्ताने होऊ लागली होती.
नाशिक शहरातील अशोकस्तंभ परिसरातील हा वाडा कोसळल्यानंतर नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नाशिक शहरातील संपूर्ण सहाही विभागात असलेले धोकेदायक वाडे आणि इमारतीच्या मालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
नाशिक शहरात सातशेहून अधिक वाडे आणि इमारती ह्या धोकेदायक स्थितीत आहे. पावसाळ्यात नोटिसा बाजावून नागरिक स्थलांतरित होत नाही. वाडा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद कोर्टात असल्याने त्याबाबत पालिकाही याबाबत कठोर भूमिका घेत नव्हती.
मात्र, नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून जीर्ण झालेल्या मालमत्तेच्या मालकांना आणि भाडेकरूंना नोटिसा दिल्या आहे
त्यामुळे घरमालक किंवा भाडेकरू यांनी पालिकेच्या नोटीसीला उत्तर दिले नाहीतर पालिकेकडून थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेचा हा कठोर निर्णय बघता येत्या काळातील कारवाई कशी होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. पालिकेच्या सहाही विभागाने याबाबत तयारी सुरू केली आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या पूर्व विभागात सर्वाधिक धोकेदायक वाडे आणि इमारती आहेत. जीर्ण स्थितीत असेलेल्या मालमता भाडेकरू आणि मालक यांच्या वादात अडकल्या आहे. अनेकांनी न्यायालयात धाव घेतलेली असल्याने पालिकेकडून हस्तक्षेप टाळला जात होता. त्यामुळे आता ही कठोर भूमिका पाहता नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद महत्वाक ठरणार आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन नोटिसा घरमालक आणि घरभाडेकरू यांना दिल्या आहे. त्यामुळे कुठलेही कारण पुढे न करता खुलासा करावा लागणार आहे.