औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात नववर्षात कृषी प्रदर्शन होत असतांना ते पाहणी दौऱ्यावर होते. त्याच दरम्यान कृषीप्रदर्शनाबाबत माहिती देत असतांना त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर याच कृषी प्रदर्शन विधानसभेत प्रश्न विचारण्यात आले होते, यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. त्यावरून अब्दुल सत्तार यांनी थेट विरोधकांना लक्ष केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं की ज्यावेळी खुर्ची चालल्या जाते त्यावेळी असे आरोप केले जातात, त्यांना दु:ख पंचवता येत नाहीये. मी जे करत आहे त्यावर ते बोलत असतील तर बोलू द्या पण मी जर चुकीचा असेल तर लोकं प्रदर्शनाला येणार नाही आणि जर खरा असेल तर लाखों लोक येतील असा दावाही सत्तार यांनी केला आहे. सत्तेतून बाहेर गेल्यावर चुकीच्या गोष्टी शोधायच्या आणि आरोप करायचे आणि आरोपाच्या माध्यमातून ते राजकीय फायदा घेत आहे. पण मी गरीबाला जागा दिल्ली, ते गरीब लोकं आहे, ब्रिटिश काळातील जमिनी आम्ही क्लिअर केल्या आहेत.
मी जी जागा दिली ती गरीबाला दिली, फाटक्या माणसाला जागा दिली, कुडाच्या घरात राहणाऱ्या लोकांना जमिन दिली आहे. पण उगाच माझ्यावर आरोप केल्या गेले असं सत्तार म्हणाले.
परंतु ज्या लोकांनी खूप जमिनी बळकावून बसले आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचे नाहीये, मी जे केलं ते सत्यं केलं आहे, माझ्या बुद्धीला जे पटलं ते केलं आहे.
जे कुटुंब आलं होतं त्यांची कागदपत्रे पाहून मी जमीन दिली आहे, ते कुटुंब रडत होतं. ते लोकं म्हणत होते की साहेब आमच्याजवळ द्यायला काहीही नव्हते पण आमची कागदपत्रे खरी असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या वर्षात त्यांना मला काहीही बोलायचे नाही, नवीन वर्षात त्यांची सगळी प्रकरणे बाहेर काढू असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. जे नियमात आहे त्यांना मी मदत केली आहे.
कोर्टात केस आहे, नागपूर कोर्टात लवकरच निकाल आहे. त्यांच्या घरी खायला काही नाही ते कसे मला पैसे कसे दिले, गायरान जमिनीवर हजारो कुटुंब बसलेले आहे, त्यावर कोर्टाला विनंती करणार आहे.
अनेक लवासे आहेत, अनेक संस्थान आहे, एक रुपया किमतीवर जमिनी घेतल्या आहेत, चांगलं काम केलं असेल पण अनेकांनी गैरप्रकार केले आहे, कोर्टात जो निर्णय होईल ते होईल मला मान्य राहील असेही सत्तार यांनी म्हंटलं आहे.
अब्दुल सत्तार यांचा रोख मात्र याकाळात पवार कुटुंबाकडे होता, ज्यांच्या शिक्षण संस्था आहे त्यांच्याकडे सत्तार यांचा रोख होता, एकूणच नवीन वर्षात सत्तार यांनी आक्रमक होण्याचा मुहूर्त सांगितला आहे.