शिर्डी, अहमदनगर : गायीने भरपूर दूध द्यावं. त्यातून भरपूर उत्पादन मिळावं यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतो. यातले कष्ट कमी व्हावेत अशी इच्छा असते. पण या सगळ्यात काही भलतेच प्रकार समोर येतात. असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. गाय (Cow) भांडे ठेवताच दुध द्यायला सुरूवात करत असल्याचं समोर आलं आहे. गाईच्या सडांमधुन आपोआप दुध येत असल्याने मगन भारूड (Magan Bharud) या शेतकऱ्याची गाय चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या 20 दिवसांपासुन असा प्रकार होत असल्याचं शेतकरी मगण भारूड यांनी सांगितलंय.
आपण आजवर अनेक गाई पाहिल्या असेल आणि गाईचे दूध हाताने किंवा मशीनच्या साहाय्याने काढताना पाहिलं असेल, माञ कोपरगाव तालुक्यात न पिळताच दूध देणारी गाय चर्चेचा विषय बनलीय. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात राहणारे शेतकरी मगण किसन भारुड यांनी 6 महिन्यांपूर्वी एक जर्सी गाय खरेदी केली आणि महिना भरापूर्वी ही गाय जनली असून तिला कालवड झाली. मात्र गाईचे दूध काढताना भारुड यांना गाईच्या सडाला हात लावण्याची गरजच पडत नाही.
भांडे ठेवताच गाय देते 4 ते 5 लिटर दूध, घटनेची परिसरात चर्चा…#Ahmednagar #Cow #Milk pic.twitter.com/wEirNFiKPu
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2022
भांडे गाईच्या सडा खाली ठेवताच आपोआप 4 ते 5 लिटर दूध निघत आहे. सध्या सदर गाईचा दूध निघतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर वायरल होताच परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या 20 दिवसांपासून सदर गाय सकाळ संध्याकाळ दररोज 4 ते 5 लिटर दूध एका वेळेस देत आहे. सुरुवातीला अपोआप दूध निघताना पाहिल्यानंतर भारुड कुटुंबाला देखील आश्चर्य वाटले.
गाय जनल्यानंतर लुझ मिल्कर असल्याने असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे हा चमत्कार वगैरेचा काही भाग नसून आश्चर्य व्यक्त करण्यासारखा किंवा घाबरून जाण्यासारखा प्रकार नसल्याच पशुवैद्यकीय अधिका-यांनी स्पष्ट केलंय.