Karjat Attack | कर्जत हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक, जखमी तरुणावर उपचार सुरु, पोलीस अधीक्षकांची माहिती

| Updated on: Aug 06, 2022 | 4:00 PM

गुरुवारी रात्री कर्जत येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक झाल्याची माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे.

Karjat Attack | कर्जत हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक, जखमी तरुणावर उपचार सुरु, पोलीस अधीक्षकांची माहिती
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदनगरः कर्जत तालुक्ययातील तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री कर्जतमधील एका तरुणावर १० ते १५ जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. यानंतर सदर तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जतमध्ये घडलेल्या या घटनेत प्रतिक उर्फ सनी राजेंद्र पवार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अहमदननगर येथील पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी सुरु असून लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेतलं जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान, अमरावती येथील कोल्हे हत्याकांडासारखीच ही घटना असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. हिंदुंवर असेच हल्ले होत राहिले तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असा इशारा राणे यांनी दिलाय..

हल्ला प्रकरणी चौघांना अटक

गुरुवारी रात्री कर्जत येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक झाल्याची माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला होता. या घटनेत तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, ‘ 549-22 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनुसार, नुपूर शर्मा यांचं स्टेटस ठेवल्यामुळे हा हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक केलेली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.’ घटनेत जखमी झालेल्या तरुणावरही गुन्हे दाखल असल्याचं बोललं जातंय, मात्र या प्रकरणी अधिक तपासानंतरच माहिती देऊ, असं वक्तव्य पोलिसांनी केलंय.

नितेश राणेंचा इशारा काय ?

कर्जत येथील तरुणावर हल्ला झाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘ नुपूर शर्मांचं समर्थन केल्यामुळे पहिली घटना उदयपूरमध्ये घडली. नंतर अमरावतीत घडली. आज अमरावतीचा कोल्हे हत्याकांडाचा तपास एनआयए करत आहे. पहिल्या दिवसापासून भाजप आम्ही या कोणत्याही विषयाचं समर्थन नाही, हे स्पष्ट केलं. तो विषय बंद केला. पण त्यानंतर अमरावतीत कोल्हेंची हत्या करण्यात आली. 4 ऑगस्ट रोजी असाच प्रयत्न कर्जत-अहमदनगरमध्ये घडली. प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाकडे जात असताना 10 ते 15 मुस्लिम युवकांनी थांबवलं. हल्ला करण्यासाठी आलेल्या तरुणांनी तू नुपूर शर्मांचं डीपी ठेवतोय, गावाच्या अन्य लोकांनाही ठेवायला सांगतोय.. हिंदू हिंदू म्हणून जास्त आवाज करतोयस… असं म्हणत त्याच्या हल्ला केला. त्यांच्या हतात धारदार हत्यार होते. त्याला खाली पाडलं. तो बेशुद्ध पडला. जमावाला तो मृत झाला, असं वाटलं. ते लोक तिथून निघून गेले. पण मित्र परिवार तेथे आला. लगेच त्याला अॅडमिट केलं. नंतर खासगी रुग्णालयात ठेवलंय. तो आज मृत्यूशी झुंज देतोय. त्याला 35 टाके पडलेत. बरगड्यांमध्ये वाईट मार लागलाय.
अशा प्रकारे वारंवार हल्ले होत असतील. अमरावतीत हिंदुंना मारून टाकण्यापर्यंत मजल जात असेल तर आमचेही हात बांधेलेले नाहीत.