धक्कादायक, अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, परिरसरात खळबळ

| Updated on: Feb 17, 2021 | 3:29 PM

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरागावमधील एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाल्यानं खळबळ माजली आहे. (Ahmednagar Shrirampur Undirgaon Corona)

धक्कादायक, अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, परिरसरात खळबळ
कोरोना संसर्ग वाढतोय
Follow us on

अहमदनगर : राज्यात आठ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्य सरकार आणि प्रशासन त्यामुळं सतर्क झालं आहे. अमरावती, अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. तर, वर्धा जिल्ह्यातील एका शाळेतील 100 पेक्षा जास्त जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आता, अहमदनगर जिल्ह्यातील एका कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.(Ahmednagar ten persons corona infected in one family of Shrirampur Taluka)

एकाच घरातील 10 जणांना कोरोना झाल्यानं खळबळ

एकाच घरातल्या दहा जणांना कोरोना झाल्याच समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झालीय. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्यास ताप आल्यानंतर तपासणी केली असता ‌कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुटूंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकुण 10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा रुग्णालयात उपचार

उंदिरगावमधील एका कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे‌. कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढत चालला असल्याच दिसूय‌ येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यानी कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या नियमावलीची‌ कठोर अंमलबजावणी करणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर जिल्हा कोरोनाबाधित आकडेवारी

एकूण रूग्णसंख्या: 73 हजार 765
मृत्यू:1116
सध्या उपचार सुरू: 855
बरे झालेल्या रूग्णांची संख्या : 71 हजार 794
बरे होण्याचे प्रमाण :97.33%
मृत्यू दर:1.5%

दरम्यान, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील तसा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते. यावेळी वडेट्टीवारांनी अमरावती-नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवरुनही चिंता व्यक्त केली.

संबंधित बातम्या:
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त; 14 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही

‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

(Ahmednagar ten persons corona infected in one family of Shrirampur Taluka)