देशभरामध्ये गणपती बाप्पाला आज मंगळवारी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात निरोप दिला जात आहे. गणेश भक्तांनी मिरवणुकीला हजेरी लावलीय. गेले दहा दिवस झालेले मंगलमय वातावरण आता बाप्पा जात असल्याने प्रत्येक भक्ताचे डोळे पाण्याने भरलेत. प्रत्येकजण आपल्या बाप्पाला निरोप देताना मोठ्या उत्साहाने मिरवणुकीला डान्स करतो. अशाच प्रकारे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे (वय ३६) यांनीही आपल्या गणपतीला निरोप देताना मनसोक्त डान्स केला. पण त्यांच्यासोबत काही तासात असं काही घडेल याचा कोणी विचारही केला नसेल.
अहमदनगर येथील कोतवाल पोलीस ठाण्यात गणपती बाप्पाची सोमवारी विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीला सर्वा पोलीस गणरायाला आनंदाच्या वातावरणात निरोप देतात. या मिरवणुकीमध्ये पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बाप्पा मोरेसुद्धा सहभागी झाले होते. ज्ञानेश्वर यांनी ही मिरवणुक गाजवली, म्हणजे पांढरा सदरा आणि भगवा फेटे बांधून डान्स केला. त्यांच्य डान्सची चर्चाही झाली. त्यांच्या सहकाऱ्यांनीही ज्ञानेश्वर यांचे मनभरून कौतुक केले.
गणपती बाप्पाला निरोप देताना ‘भीती कोणाची कशाला…’ या मराठी गाण्यावर त्यांनी कमाल डान्स केला. पण रात्री जेव्हा घरी गेले तेहा काही तासातच मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना काही वेळात घरच्यांनी रूग्णालयात दाखल केले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ज्ञानेश्वार मोरे यांच्या मृत्यू झाल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर शोककाळा पसरली आहे.
दरम्यान, गणपती बाप्पासमोर डान्स करणारा हा बाप्पा काही तासांचा पाहुण आहे, असा तिथे उपस्थित कोणीही विचारही केला नाही. त्यामुळे मरण कधी कोणाला येईल काही सांगता येत नाही.