मुंबई | 04 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल एक वक्तव्य केलं. प्रभू राम मांसाहारी असल्याचं आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी नेहमी महाराष्ट्राला संबोधित करत असतो. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. मी इतिहासाची मोडतोड करत नाही तर काही पुराव्यांच्या आधारे आपण हे वक्तव्य केल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
राम- प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणतो. जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाहीये. पण जे याच्या विरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. त्यातल्या अयोध्या कंदातील सर्ग 52 आणि श्लोक 102 यात हा उल्लेख आहे. मात्र मला हा वाद वाढवायचा नाही म्हणून मी हे वाचून दाखवत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. राम हा बहुजनाचा आहे आणि आमचा राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. यांना राम आत्ता निवडणुकीकरिता हवा आहे. आमचा राम हा मनात आहे, असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.
आता वाल्मिकी रामायणात काही लिहिलेलं असेल. त्यावर कुणाचा आक्षेप असेल. तर त्यांनी ते सांगावं. 1 डिसेंबर 2023 अन्नपुराणी नावाचा एक सिनेमा आलाय. दक्षीणेतेली दोन सुपरस्टारने यात काम केलंय. यात त्यांनी श्लोक म्हणून दाखवला आहे. त्याचा अर्थही सांगितला आहे. ते तुम्ही पाहू शकता. मी केलेलं वक्तव्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.