अहमनगर येखील पाथर्डी शहरातील नाथनगर येथील जय बजरंग तरुण मंडळ, वामन भाऊ नगर येथील शिवशंभ तरुण मंडळ या मंडळाची विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजत होते हे डीजे नाईक चौकात समोर येऊन आवाजाची स्पर्धा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास झाला. या प्रकरणी कोणत्याच प्रकारची कारवाई न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
कोणत्या डीजेचा आवाज जास्त याची दोन डीजे मध्ये वाजवण्यावरून स्पर्धा सुरू असताना एका तरुणाचा डीजेच्या साऊंड वरून पडून गंभीर दुखापत झाली. डीजेच्या दन दनाटाच्या आवाजाच्या प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी लाठी चार्ज करून मोठा जमा पांगवला. पाथर्डी शहरातील नाईक चौकात दोन डीजेची स्पर्धा सुरू झाली कोणत्या डीजेचा जास्त आवाज अशी जीवघेणी आवाजाची स्पर्धा सुरू होते.
पाथर्डी शहरातील नाथनगर जय बजरंग तरुण मंडळ, वामन भाऊ नगर येथील शिवशंभ तरुण मंडळ या मंडळाची विसर्जन मिरवणुकीत Dj वाजत होते हे DJ नाईक चौकात समोर येऊन आवाजाची स्पर्धा झाली. नागरिकांना याचा त्रास झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्याने भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. #viralvideo pic.twitter.com/IesEyb3P1d
— Harish Malusare (@harish_malusare) September 14, 2024
प्रचंड मोठा आवाज, लेझर लाईटचे किरणे, डीजेच्या ठोक्याने परिसरातील असलेल्या दुकानातील सर्व वस्तू हादरून गेल्या तर काही वस्तू फुटल्या. याबाबत नागरिकांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्या मात्र आवाज सुरूच होता या जीव घेण्या स्पर्धेत 12 फूट डीजे वरून एक तरुण पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर मग पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत गर्दी पांगवली या डीजे वरून पडल्यामुळे अलिम शेख हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.