छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांप्रमाणे राष्ट्रवादीचे आठ खासदार महाराष्ट्राची काळजी घेतील- शरद पवार

| Updated on: Jun 10, 2024 | 10:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. शरद पवार हे लक्षात ठेवत राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांप्रमाणे राष्ट्रवादीचे आठ खासदार महाराष्ट्राची काळजी घेतील- शरद पवार
Follow us on

लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने आठ जागांवर बाजी मारली होती. यामध्ये भाजपच्या दोन तगड्या उमेदवारांनाही शरद पवारांच्या उमेदवारांनी पराभूत केलं. बाडमध्ये पंकजा मुंडे आणि नगरमध्ये सुजय विखेंनाहीा झटका दिला, आज सोमवारी राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापना दिन अहमदनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भटकती आत्मा या वक्तव्यावरून घणाघाती टीका केली.

काय म्हणाले शरद पवार?

आपण हा देश कसा प्रगतीच्या मार्गावर न्यायचा हा विचार करूया. यासाठी आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर राम मंदिराचा प्रश्न महत्त्वाचा राहिल पण भाजपवाल्यांनी राम मंदिराचा वापर राजकारणासाठी केला गेला. मात्र अयोध्येच्या जनतेने त्यांना दाखवून दिलं. या पक्षाचे सर्व खासदार तुमच्या राज्याचे जिल्हे आणि राज्याचे जे जे काही महत्त्वाचे प्रश्न दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान बनलं होतं तसंच राष्ट्रवादीचे आठही खासदार महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची काळजी घेतील याची खात्री मी देत, असं शरद पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी मला काय म्हणाले हा भटकता आत्मा आहे, एकादृष्टीने ते बरोबरच बोलले कारण आत्मा हा कायम राहतो आणि हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केलेल्या शिवसेनेला नकली म्हणून उल्लेख केला, हे बोलणं शोभतं का? एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्यांची पार्श्वभूमी नकली असल्याचं पंतप्रधानांनी बोलायचं. सत्ता मिळायची शक्यता नसली की माणूस बेफाम आमि अस्वस्थ कसा होतो तशी स्थिती त्यांची झाली. हे सर्व विसरून जाऊया, असं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.