देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर…; रोहित पवार यांचं मोठं विधान

| Updated on: Nov 12, 2024 | 3:47 PM

Rohit Pawar on Devendra Fadnavis : अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांची सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत रोहित पवारानी थेट आरोप केला आहे. वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर...; रोहित पवार यांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार निवडणूक लढवत आहेत. आज जामखेडमध्ये रोहित पवार यांची सभा झाली. यावेळी रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठं विधान केलं आहे. कोविड काळात आम्ही लोकांची सेवा केली आणि हे गाणी ऐकत होते. देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर फोडले. राम शिंदे यांना जिथे मत मिळाली तिथे देखील पाण्याचे टँकर दिले. लांपीचा रोग आला तेव्हा ते गायब झाले तेव्हा ते कुठल्या घरी गेले माहित नाही. पवारांची ताकद कमी नाही, फक्त फोन कोणासाठी करायचा हे महत्वाचे आम्ही कधी गुंडासाठी फोन नाही केला, असं रोहित पवार म्हणाले.

फडणवीसांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते रोहित पवारांना मतदार संघात अडकवून ठेवा मात्र त्यांना ते जमले नाही… तर लोकसभेला अमित शहा म्हणाले पवार साहेबांनी दहा वर्षात काय केले. तेव्हा लोकांनी त्यांना लोकशाही मार्गाने उत्तर देत 9 जागा दिल्या. आता ही तेच म्हणाले त्याच उत्तर त्यांना मिळेल. आपलं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे. तर लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही.आपण एक लाख मतांनी निवडून येणार आहोत, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

23 तारखेला गुलाल आपलाच- रोहित पवार

गेली पाच वर्षी घरी बसले होता, त्यामुळे इथली जनता लय हुशार आहे. आम्ही पैसा दारू वाटली नाही मात्र लोकांना मद्दत केली. मी कधी खालच्या पातळीवर बोललो नाही, भाषण केले नाही. काहीजण विचारतात की, तू बाहेर का प्रचाराला जातो? तेव्हा मी सांगितले माझ्या लोकांवर माझा विश्वास आहे. 20 मतदान करायचे 23 तारखेला आपल्याला गुलाल घ्यायचा आणि शपथविधी करायचा, असं रोहित पवार जामखेडच्या भाषणात म्हणाले.

गेल्यावेळी पेक्षा यावेळी जास्त लीड पाहायला मिळेल. संजय राऊत मुंबई विमान तळावर आहे. मात्र हेलिकॉप्टरला परवानगी मिळत नाही. विरोधकांना भीती वाटत असेल त्यामुळे परवानगी मिळत नाही. राम शिंदे म्हतात मी भूमिपुत्र मात्र लोकांनी ठरवलंय कोणाला निवडून द्यायचे. गेल्या पाच वर्षात राम शिंदे कुठे गेले होते? कोरोना काळात झाडाला पाणी घालत होते, तर ते म्हणाले मी किशोर कुमारची गाणे ऐकत होते.मी पूर्वी गोरा होतो आता काळा झालो. मात्र राम शिंदे गोऱ्यावर गोरे होत चाललेत. ते उन्हात लोकांसाठी येत नाहीत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.