अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी पाथर्डी बाजारतळावर प्रचारसभा झालाी. या सभेत दिवंगत नेते आर. आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी भाषण केलं. दोन मतदारसंघाची चर्चा सबंध राज्यात सुरु आहे ते म्हणजे बारामती आणि अहमदनगर दक्षिण… बारामती कशी निवडणुकीत सुरु आहे हे सांगायची गरज नाही. मात्र नगर दक्षिण मध्ये हुकूमशाही स्वाभिमान आणि लाचारी चा फरक करणारी ही निवडणूक आहे. नगर दक्षिणची निवडणूक चर्चेत असण्याचे कारण आहे की स्वाभिमानामध्ये आणि लाचारीमध्ये फरक करणारी निवडणूक यंदाची आहे, असं रोहित पाटील म्हणाले.
एका बाजूला हुकूमशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला नगर दक्षिणमधले सर्व लोक… एकत्रितपणे येऊन लोकशाही टिकवण्यासाठी स्वाभिमानाने उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर अनेक ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर निलेश लंकेचा विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असंही रोहित पाटील म्हणाले.
निलेश लंके यांच्या रूपाने अत्यंत प्रामाणिक उमेदवार आपल्या सर्वांना मिळालेला आहे. जो लोकांसाठी काम करतो असं उमेदवार आपल्याला सर्वांना मिळालेला आहे. कोरोना काळामध्ये निलेश लंकेने या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांसाठी दवाखाना चालू केला. नगर जिल्हा सबंध जगाचा नकाशा वरती आणण्याचं काम पुन्हा एकदा निलेश लंके यांनी केलं. आता हेलिकॉप्टरमधून फिरणारी लोक आपल्याला पाहिजे का? सर्व सामान्य लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्यासाठी काम करणाऱ्या नेतृत्व आपल्याला पाहिजे? भाजपचे लोक यावेळेस निलेश लंके उमेदवाराला हलक्यात घेत होते. पूर्वी पाच लाखात आम्ही निवडून येऊ म्हणणारे आज गल्लीबोळात फिरायला लागले आहेत, असं रोहित पाटील म्हणाले.
देशाच्या पंतप्रधानांची सभा ही आपल्या साधा उमेदवाराला पाडण्यासाठी आज नगर जिल्ह्यासारख्या ठिकाणी झाली.आता उमेदवार जर आमचा साधा असता तर देशाच्या पंतप्रधानांना नगर जिल्ह्यामध्ये यायची गरज भासली असती का? 13 तारखेला आपल्याला निलेश लंकेना मोठ्या मताधिक्याने विजय करायचा ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. मला आल्यावर समजलं की काही दिवसांपूर्वी इथं डाळ साखर वाटली गेलेली आहे. आता डाळ साखर वाटून खासदार बनते पहिल्यांदाच ऐकलं. आमच्याकडे डाळ वाटणाऱ्याला साखर वाटणाऱ्याला नवीन रेशन दुकान आम्ही टाकून देत असतो. टाळ वाटून खासदार होता येत नसता मात्र रेशन दुकानदार नक्की होता येतं, असं रोहित पाटील म्हणाले.