आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय उलथापालथ होताना दिसेल. महायुती आणि मविआमध्ये जागावाटपावरून खटके उडू शकतात. त्यामुळे नाराज असलेले ताकदीचे उमेदवार गट बदलण्याची दाट शक्यता आहे. मविआकडून महायुतीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे. तर महायुती आपले सरकार आणण्यासाठी तयारी करत आहे. अशातच भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटासह उबाठा गटाला मोठा धक्का दिला आहे. फडणवीसांनी फिरवलेल्या जादुच्या कांडीमुळे एकाच मतदारसंघातील मविआच्या दोन्ही पक्षांना झटका बसलाय.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांच्यासह उबाठा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे आणि मविआचे पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत प्रदेश मुख्यालयात प्रवेश पार पडला.
रोहित पवार कर्जत जामखेड साठी काही करू असं म्हणाले पण काही केले नाही. प्रश्न सोडवले नाहीत. रोहित पवार यांच्याकडे शंभर दीडशे पीए आहेत पण काम कुणीही करत नाही. कार्यकर्ता जिवंत राहू नये यासाठी खच्चीकरण करण्याचा काम रोहित पवार करत आहेत म्हणून मी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला. राम शिंदे यांच्या शिष्टाईने आज भाजपात आलो. फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्राचं काही तरी भलं झाल्याशिवाय राहणार नाही. काही सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याचं मधुकर राळेभात यांनी सांगितलं.
ही आनंदाची बाब आहे. कर्जत जामखेड येथून शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आहेत. ज्यांनी राष्ट्रवादी रुजवली, त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करतो, खरं म्हणजे कर्जत जामखेड ची लढाई ही प्रस्तावित विरोधात विस्तापितांची आहे. विस्थापितांचे नेते म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे. विस्थापितांचे नेतृत्व करणारे आबा व त्यांची टीम ही भाजपात प्रवेश करत आहे. तोंडात चमचा घेऊन हे वर आलेले नाही. एक एक व्यक्ती जोडून नर आलेली ही टीम आहे.राम शिंदे आणि आलेली टीम या दोन टीममुळे ताकद वाढल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ही विस्थापितांची लढाई निर्णायकी लढावी लागेल. सामान्य माणसांचे दुख सामान्य माणसालाच कळते. तरच मतदारसंघातील जनतेला न्याय मिळतो. सरकार धडाडीने निर्णय घेत आहे. परिवर्तन घेणारे निर्णय आहेत. पाण्याच्या थेंबासाठी लढत आहोत. गोदावरीच्या खोऱ्यात पाणी आणण्यासाठी मंजुरी दिली, तसेच टेंडर काढलेय. पाण्यासाठी आपापसांतले संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा जलमय करण्याचे काम झाले आहे. बाळासाहेबब विखे पाटील सातत्याने मागणी करत होते. मात्र काँग्रेस सरकारने ते केले नाही. आज तेथील शेतकरी बागायतदार करण्याचे निर्णय आपण घेतले आहेत, निर्णयांची फार मोठी यादी आहे. जनतेचा विश्वास वाढला आहे. पुन्हा महायुतीचे सरकार येणार. या सरकारमध्ये कर्जत जामखेडची जागा ही महायुतीची असेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.