काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते. मात्र त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळली नाही. या मागचं कारण काय? हे सुजय विखे यांनी सांगितलं. आपण महायुतीचा प्रचार करण्यासाठी संगमनेरमध्ये वातावरण तयार करत होतो. माझ्या स्टेजहून ते वाक्य बोलल गेल्याने विरोधकांना ती संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचा लोकशाही नव्हे तर दडपशाही पद्धतीने त्याचा वापर केला. मतदारसंघात माझ्याबाबत नेरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून वरच्या पातळीवर निर्णय होऊन ती जागा शिवसेना शिंदे गटाला गेली असावी, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.
आपण सगळ्या बाजूने तयार होतो आपला सर्व्हे ग्रामीण भागातून तयार होता. लाडकी बहिण, महिलांसाठी डोल, संजय गांधी निराधार योजनेबाबत अमोल ग्रामीण भागात पोहचला आहे. अमोल याने युवकांचे संघटन चांगल्या पद्धतीने केलंय.मी भारतीय जनता पक्षाचा माजी खासदार असल्याने मी शिवसेना शिंदे गटात जाऊ शकलो नसतो. त्यामुळे आम्ही अमोल याच नाव शिंदे गटाच्या जागेसाठी सुचवलं, असंही सुजय विखे म्हणाले.
उमेदवारी कशामुळे नाकारली याच उत्तर पक्षश्रेष्ठींनी द्यावं. भारतीय जनता पक्षाला ती जागा का नाही सुटली. महायुतीच्या अंतर्गत ८ जागांमध्ये चर्चा सुरू होती त्यात संगमनेरचा समावेश होता. श्रीरामपूरमध्ये महायुतीकडून दोन व्यक्तींना AB फॉर्म देण्यात आले होते मी याबाबत पक्षश्रेष्टींना कळवलं. ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. मी तालुक्यात जे वातावरण निर्माण केलं होत त्या वातावरणाला या घटनेमुळे ग्रहण लागलं. जो निर्णय संगमनेर बाबत पक्षश्रेष्ठींनी घेतलाय तो पुढे घेऊन चालावं लागेल, अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली आहे.
विखे परिवारावर खालच्या पातळीवर टीका केली तर आम्ही आणि आमचे कार्यकर्ते ऐकून घेणार नाहीत. इथून मागे आम्ही शांत बसलो. यापुढे शांत बसणार नाही. मी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जर कोणी आपल्यावर खालच्या पातळीवर टीका केली तर ऐकून घ्यायच्या नाही, अशा शब्दात सुजय विखेंनी विरोधकांना इशारा दिलाय.