मुंबई : “गाव कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज (18 जानेवारी 2020) जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Election Results Winners)
“स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे,” असेही अजित पवार म्हणाले.
“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा,” असे अजित पवार निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना दिलेल्या संदेशात म्हटले.
दरम्यान काही वेळापूर्वी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यात महाविकासआघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाचा देखील पराभव झाला आहे. तर या ठिकाणी कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांच्या गटाचा विजय होताना दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Election Results Winners)
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : आपली इज्जत आपणच राखावी, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल#grampanchayatelection2021 #shivsenahttps://t.co/T34dgIkRWn
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या :
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची धामधूम, अजित पवारांची प्रतिक्रिया