मुंबई : अधिवेशनाचा गुरूवारचा दिवस फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तुफान आरोप करत गाजवला. मात्र त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पावारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांच्या आरोपांचा समार घेऊन मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) बसले. मग लगेच अजित पवार (Ajit Pawar) बोलायला उभा राहिले. अजित पवारांनीही फडणवीसांना जोरदार कोपरखिळ्या मारल्या. उत्तर महाराष्ट्रला अजूनही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. कोकणाला दहा वर्षे मिळालं, पश्चिम महाराष्ट्रवाला 20 वर्षे मिळालं तर मराठवाडा आणि विदर्भाला तर तब्बल 32 वर्षे मुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रातून कोणी मुख्यमंत्री झालं नाही. यावरूनच अजित पवारांनी भाजपला पुन्हा डिवचलं आहे. त्यांनी खडसे आणि गिरीश महाजन यांचं नाव न घेता भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये उत्तर महाराष्ट्रातून एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र खडसेंना त्यावेळी डावलून महसूल मंत्रीपद देण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाची माळ तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली. त्यामुळे खडसेंचा चान्स थोडक्यात हुकला. नंतर आरोप झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. अजित पवारांनी हेच नाव न घेता विधानसभेत हसत हसत बोलून दाखवलं आहे. उत्तर महाराष्ट्रातला दुसरा चर्चेतला नेता म्हणजे गिरीश महाजन. गिरीश महाजन एकेकाळी भाजपचे संकमोचक म्हणून ओळखले जायचे. अजित पवारांनी नाव न घेता त्यांच्याकडेही इशारा केला आहे.
उत्तर महाराष्ट्रातून एकाच चान्स गेला असला तरी दुसरा नेता तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस दिल्लीतल्या राजकारणात गेल्याशिवाय त्यांना राज्यात संधी मिळणार नाही. त्यामुळे फडणवीसांनी दिल्लीच्या राजकारण जावं. मग विरोधी पक्षनेते म्हणून कसे बोलतात, कसे वागतात हे कळेल, म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजनांकेड इशारा केला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आधी महाजन खडसे ही जोडगोळी एकाच पक्षात म्हणजे भाजपात होते. मात्र खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि खडसे महाजन यांच्यातला छुपा संघर्ष खुल्यापणे बाहेर आला. आता भाजपकडून उत्तर महाराष्ट्राची बाजू मांडण्यात गिरीश महाजन पुढे असतात.
मुंबई ते दिल्ली “पेनड्राईव्ह बॉम्ब”ची दहशत, मुंबईत फडणवीस तर दिल्लीत नवनीत राणांकडून पुरावे सादर