महाराष्ट्रात विधानसभेचा धक्कादायक निकाल लागला आहे.विधानसभेत महायुतीला मिळालेल्या 236 जागा मिळाल्या आहेत. तर विरोधक महाआघाडीचा खेळ अवघा 50 च्या आता आटोपला आहे. त्यानंतर विरोधकांनी या निकालावर आक्षेप नोंदवत ईव्हीएमचा वापर बंद करावा अशी मागणी केली आहे. या निवडणूकीत पैशांचा मोठा खेळ झाल्याचा आरोप होत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. या प्रकरणात ज्येष्ट समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे.बाबा आढाव यांच्या आंदोलन स्थळी सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जाऊन भेट दिली आहे. त्यानंतर दुपारी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणूकांचत पैशांचा वारेमाप वापर झाला. या निवडणूकांच्या निकालांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. अजितदादा पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. विरोधक ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडत आहे. लोकसभा निवडणूकांच्या वेळी यांची ईव्हीएम विरोधात काही तक्रार नव्हती असे अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. आम्ही सरकारच्या लोकसभेतील पराभवातून जनतेच्या फायद्याच्या योजना आणल्या. आपण लोकसभेत दारूण पराभव झाल्यानंतर फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. त्यांना सांगितलं गरीबांना काय लाभ देता येतं की नाही ते पाहा. त्यानुसार लाडक्या बहीण योजना, तीन गॅस सिलिंडरचे पैसे बाजूला काढले आणि आम्ही निर्णय घेतल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.
हे पैसे काही आमच्या घरचे पैसे नव्हते. जनतेचे पैसे होते. संजय गांधी निराधार योजनेत अंतुले साहेबांनी ६० रुपये दिले. आम्ही १५०० रुपये दिले. ती योजना अजूनही सुरू आहे. आम्ही विचारलं कोणती योजना पॉप्युलर आहे. तर मध्यप्रदेशातील ‘लाडकी बहीण’ योजना असे सांगितले गेले. ती घेतली आम्ही घेतली कर्नाटकात तर काँग्रेसवाल्यांनी अनेक योजना दिल्या आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी किती तरी योजना मोफत दिल्या. केजरीवालही वीज मोफत देण्याचं जाहीर केले. आम्ही फक्त १५०० हजार दिले. आणि विरोधकांना त्यांचा जाहीरनामा काढला. त्यांनी लाडकी बहिण योजनेत ३ हजार देऊ . पदवीधरांना ४ हजार देऊ असे सांगितले. तीन लाखांपर्यंत कर्ज देणार असल्याचेही सांगितले. त्यांनीही प्रलोभन दिलंच ना. तुम्ही आम्हालाच कसे बोलता असेही अजित पवार यावेळी म्हणाले.