गिरीश महाजन यांना कुठली जबाबदारी द्यायची? अजित पवार यांनी थेट सांगूनच टाकलं, विधानसभेत अजित पवारांची तूफान फटकेबाजी

| Updated on: Dec 27, 2022 | 3:57 PM

गिरीश महाजन यांना कोणती जबाबदारी द्यायची हे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितल्याने संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता,

गिरीश महाजन यांना कुठली जबाबदारी द्यायची? अजित पवार यांनी थेट सांगूनच टाकलं, विधानसभेत अजित पवारांची तूफान फटकेबाजी
Image Credit source: Google
Follow us on

नागपूर : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर साडेचार वर्षे मुख्यमंत्री राहायचे आणि नंतरच्या सहा महिन्यात वेगळा विदर्भ करायचा असं त्यांच्या मनात होतं आता ते कितीही नाही म्हंटले तरी त्यांच्या मनात होतं असे पटवून देत असतांना अजित पवार यांनी विधानसभेत तूफान फटकेबाजी केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रातील मंत्री पदावरून शिंदे-फडवणीस सरकारवर हल्लाबोल करत असतांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आणि सहा खात्यांची जबाबदारी आहे त्यावरून देखील टोला लगावला आहे. यावरच बोलत असतांना अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढत होते, मंत्रिमंडळाचा विस्तार यावरून नाराजी व्यक्त करत होते, त्याचवेळी मुख्यमंत्री पद हे राज्यातील सर्व विभागाला मिळाले आहे, पण उत्तर महाराष्ट्राला मिळाले नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही अशी खंत व्यक्त करत असतांना गिरीश महाजन यांच्या नाव सभागृहात सदस्यांनी घेतले.

त्यावेळी अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची चांगलीच फिरकी घेतली, अजित पवार म्हणाले गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद नाही तर मोठी जबाबदारी द्यायची ठरलं आहे.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढवण्यासाठी त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे, त्यांचा संपर्क तसा आहे, युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ म्हणून पवार यांनी तूफान फटकेबाजी केली आहे.

अजित पवार यांनी यावेळी गिरीश महाजन यांचे फार कॉटॅक्ट आहे ते झटपट कॉट्रॅक्ट करतात असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.

फडवणीस यांच्या मनातील बाब अजित पवार यांनी सांगून वेगळा विदर्भ करण्याचा विचार करू नका, एक दिलाने महाराष्ट्रात राहू, महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.