मुंबई : देहूतील शीळा लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या न झालेल्या भाषणावरून राजकारण सुरू झालं आहे. त्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तर पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी भाषणाला संधी द्यायला हवी होती. तसं न करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे म्हटलं होतं. तर त्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राज्यभरात आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार यांनी एका कार्यक्रमात हा विषय तेथेच संपला असून पुढे चला असं म्हटलं आहे. यादरम्यान याच मुद्द्यावरून विरोधी पत्र नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavi) यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर असताना मी आणि अजित पवार एकाच मचावर आल्याचे कोणाला बघवलं गेलं नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
देहूतील येथील शीळा लोकार्पणाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली मात्र अजित पवार यांचे झाले नाही. यामुळे स्वत: पंतप्रधान मोदी यांनी याबाबत विचारणा केली. तर अजित पवार यांना भाषण करण्यासाठी सांगितले. मात्र काही कारणाने अजित पवार यांनी मोदी यांचा मान राखत नाही म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला असं म्हणणे योग्य नसल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आपण दोघे एकाच व्यासपिठावर आल्याने ते कोणाला तरी बरे वाटलं नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. अजित दादा हे मनमोकळे पणाने बोलतात.
तसेच पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं भाषण करा. मात्र अजित पवार म्हणाले, मी बोलत नाही, तुम्ही बोला. यानंतरही या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम आहे. मला तर वाटतं, हे अजित पवारांविरोधातच षडयंत्र आहे.
त्याचबरोबर फडणवीस यांनी राज्यसभेच्या निवडणूका पार पडल्या असून आता विधानपरिषद आहे. तर आमचे मिशन लोकसभा असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजपची महत्वाची बैठक पार पडली असून आम्ही कार्यकर्त्यांना लोकसंपर्काबाबत सतर्क केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच कार्यकर्त्यांनी कामं कशी हाताळायची याची माहिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
त्याचबरोबर देशाच्या विविध भागात सुरू असणाऱ्या काँग्रेसच्या ईडी विरोधाच्या आदोलनावर बोलताना त्यांनी काँग्रेसचं आंदोलनच चुकीचं असल्याचे म्हटलं आहे. तर राहुल गांधी यांची चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाने ठवली आहे. त्यामुले ही चौकशी होत आहे. तर राहुल गांधी यांनी यंग इंडियाच्या नवे व्यवहार फिरवले. ज्यामुळे सर्व सपत्ती ही गाधी परिवाराला मिळाली. काँग्रेस दबाव आणतंय हे चुकीचं आहे.