मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटाला हादरा बसणार अशा चर्चा सुरु झाल्या. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार त्यामुळेच अजित पवार यांना आपल्याकडे खेचून देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी खेळली अशीही आणखी एक चर्चा सुरु होती. मात्र, अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याविरोधात भाजप, शिवसेना असा सामना होता. या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडी निर्माण झाली. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 उमेदवारांचा पराभव करून शिवसेनेचे आमदार निवडून आले होते.
अजित पवार यांनी आगामी निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि भाजपच्या सोबतीने लढविण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, आपल्या समर्थक आमदारांचे संख्याबळ वाढविण्यावर अजित पवार यांचा भर असणार आहे. त्यामुळे पराभूत झालेल्या जागांवर नेमका दावा कोण सांगणार हा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे शिंदे गटाच्या विद्यमान तेरा आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
मतदारसंघ | शिवसेना उमेदवार | मिळालेली मते | राष्ट्रवादीचे उमेदवार | मिळालेली मते |
---|---|---|---|---|
पाटण | शंभूराज देसाई | 106266 | सत्यजित पाटणकर | 92091 |
पैठण | संदीपान भुमरे | 83403 | दत्तात्रय गोरडे | 69264 |
परांडा | तानाजी सावंत | 106674 | राहुल मोटे | 73772 |
रत्नागिरी | उदय सामंत | 118484 | सुदेश मयेकर | 31149 |
कोरेगाव | महेश शिंदे | 101487 | शशिकांत शिंदे | 95255 |
एरंडोल | चिमणराव पाटील | 82650 | अण्णासाहेब पाटील | 64648 |
चोपडा | लताबाई सोनवणे | 78137 | जगदीश्चंद्र वळवी | 57608 |
वैजापूर | रमेश बोरनारे | 98183 | अभय पाटील | 39020 |
नांदगाव | सुहास कांदे | 85275 | पंकज भुजबळ | 71386 |
कुर्ला | मंगेश कुडाळकर | 55049 | मिलिंद कांबळे | 34036 |
कर्जत | महेंद्र थोरवे | 102208 | सुरेश भाऊ लाड | 84162 |
दापोली | योगेश कदम | 95364 | संजय कदम | 81786 |
राधानगरी | प्रकाश आबीटकर | 105881 | के. पी. पाटील | 87451 |