वस्ताद सगळे डाव शिकवतो पण एक…; धर्माराव आत्रामांच्या लेकीला अजित पवारांचा सज्जड दम

| Updated on: Sep 07, 2024 | 11:43 AM

Ajit Pawar on Dharmarao Baba Atram Daughter Bhagyashree : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल गडचिरोलीत सभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. धर्माराव बाबा आत्राम यांच्या लेकीच्या पक्षांतरावरही त्यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

वस्ताद सगळे डाव शिकवतो पण एक...; धर्माराव आत्रामांच्या लेकीला अजित पवारांचा सज्जड दम
अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. गडचिरोलीत शरज पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. यावर भाग्यश्री यांच्या पक्षांतरावर बोलताना अजित पवारांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना अजित पवारांनी सज्जड दम दिला आहे.

अजित पवारांचा भाग्यश्री यांना दम

बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा ठरविलं, असं बाबाने सांगितलं. ती आता बाबा च्या विरोधात उभी राहील म्हणते हे शोभते का? तुम्ही आशा गोष्टीत लक्ष देऊ नका. वस्ताद सगळे डाव शिकवतो पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून तुम्ही बाबा च्या मागे उभे राहा त्यांना निवडून आणा, असं अजित पवार गडचिरोलीच्या सभेत म्हणाले.

भाग्यश्री यांचा पक्षप्रवेश कधी?

मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर आणि त्याचे पती ऋतुराज हलगेकर हे दोघेही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 11 किंवा 12 तारखेला भाग्यश्री आणि त्याचे पती ऋतुराज हलगेकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत पिता विरुद्ध कन्या असा सामना होण्याची दाट शक्यता आहे.

यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे करून करून मदत करतो आहे. थोडा वेळ लागतो कारण सगळीकडेच पाऊस पडत आहे. तुमच्या जिल्ह्यातच तुम्हाला नोकऱ्या देण्याचं काम आम्ही करतो आहे. जगाच्या पाठीवर आता गडचिरोलीचं नाव आलं आहे. आदिवासींला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही योजना आणल्या तुम्ही चिंता करू नका. लोकसभेत जरा वेगळा कौल मिळाला कारण सांगितलं गेलं संविधान बदलणार पण तुम्हाला सांगतो. कोणी संविधान बदलू शकत नाही त्यांच्यावर विस्वास ठेऊ नका. सगळ्या समाजासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्था काढल्या त्यातून त्यांचा विकास होईल. लोकसभेत खोटा प्रचार झाला त्यात गडबड झाली. संविधान सगळ्यात उच्च आहे. त्यामुळे त्या खोट्या प्रचाराला हाणून पाडा, असं आवाहन अजित पवारांनी गडचिरोलीकरांना केलं आहे.