पुणेकर खूपच हुशार, लगेच कोर्टात जातात, पण पिंपरीत…, अजित पवारांची टोलेबाजी

| Updated on: Feb 26, 2022 | 11:13 AM

कोरोनाच्या काळात अनेकांना आरोग्याची काळजी किती घ्यायला हवी हे समजलं. त्यावेळी महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने विमानाने ऑक्सिजन आणण्याची तयारी केली होती. सध्या अधिक झाडं लावायची गरज असून निसर्गाला सुट होतील अशीच झाडे लावली पाहिजेत असंही ते म्हणाले.

पुणेकर खूपच हुशार, लगेच कोर्टात जातात, पण पिंपरीत..., अजित पवारांची टोलेबाजी
अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे – तळजाई (taljai) वर प्रतिदिन 1 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला, त्याला विरोध झाला, आपण 100 रुपयांचे पेट्रोल (petrol) घालून इथपर्यंत येतो. पण 1 रुपया देणार नाही. तसेच पुण्यात लोक खूपच हुशार आहेत लगेच कोर्टात जातात, मला पिंपरी चिंचवड (pimpri chichwad) मध्ये ही अडचण जाणवली नाही, कुठल्याही गोष्टीला विरोध करण्यापूर्वी थेट कोर्टात जाण्याआधी चर्चा करायला हवी. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. आपण पक्षीय भेद बाजूला ठेवून चर्चा करायला पाहिजे असं बोलून अजित पवारांनी (ajit pawar) तिथल्या विरोधकांना चांगलाच टोला लगावला. आज अजित पवार तळजाई वन उद्यानातील अनेक विविध कामाचं उद्घाटन केलं त्यावेळी त्यांनी तळजाई परिसरात फेरफटका देखील मारला. तिथं लावलेल्या झाडांची त्यांनी पाहणी देखील केली. पुण्यात मोठ्या प्रमाणात काँक्रेट जंगल तयार व्हायला लागलं आहे, तर सुदैवाने पुण्यात वन विभाग, सरंक्षण खात यांच्या मोठया जागा आहेत. तिथं हिरवाई राहिली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले.

काही लोक राजकिय फायद्यासाठी झोपडपट्टी वाढवण्यास प्रोत्साहन देतात

तळजाई परिसरात फेरफटका मारत असताना त्यांनी अनेक गोष्टी बारकाईने पाहिल्या असल्याचं समजतंय. दुर्दैवाने काही लोक राजकीय फायद्यासाठी झोपडपट्टी वाढवण्यास प्रोत्साहन देतात देत असल्याचं अनेकदा दिसलं आहे. गरिबांना हक्काची घर मिळाली पाहिजे,पण झोपडपट्टी वाढायला नको त्यासाठी एसआरए सारखे प्रोजेक्ट राबतोय असंही त्यांनी सांगितलं. लोक कोठेही कचरा टाकतात, हे योग्य नाही, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, तळजाईवर भटक्या कुत्र्याचा त्रास वाढल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या आहेत. इथं पूर्वी ससे खुप होते, पण कुत्र्यांमुळे ससे राहिले नाहीत. तसेच परिसरातले मोर कमी झालेत, काही लोकांनी डुकरी इथं परिसरात आणून सोडलीत. इथं आता कुत्री आणायला बंदी केली आहे. त्यामुळे यापुढे इथल्या परिसरात कुत्री दिसणार नाहीत. आधीच्या सरकार मधल्या वनमंत्र्यांनी इथं सु बाभळीची झाड लावली, जी लावायला नको होती, आता ती झाड काढून दुसरी झाड लावणार असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले. तसेच इथं देशी आणि स्थानिक झाड लावली असं आवाहन देखील केलं आहे.

अनाथालयासाठी 22 कोटी रूपयांचा निधी मंजूर

कोरोनाच्या काळात अनेकांना आरोग्याची काळजी किती घ्यायला हवी हे समजलं. त्यावेळी महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने विमानाने ऑक्सिजन आणण्याची तयारी केली होती. सध्या अधिक झाडं लावायची गरज असून निसर्गाला सुट होतील अशीच झाडे लावली पाहिजेत असंही ते म्हणाले. तळजाई परिसरात काही ठिकाणी चुकीची काम झाली आहेत, ती लवकरचं काढून टाकणार आहे. त्याचबरोबर प्राण्यांच्या अनाथालयासाठी 22 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तिथलं प्रदुषण कमी करण्यासाठी हे धोरण राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. इथं पाळीव कुत्री घेऊन येऊ नका, कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा….आमचं काही म्हणणं नाही….पण इथं कुत्र्यांमुळ प्रश्न निर्माण होतोय. तसेच मी शनिवारी आणि रविवारी पुण्यात असतो. त्यामुळे इथल्या अधिका-यांना सकाळी लवकर उठावे लागतं.

Fact Check : युद्धात अर्धमेल्या बाईच्या पोटी पुतीनचा जन्म? अंगावर काटा आणणाऱ्या व्हायरल स्टोरीचं सत्य काय?

Video: जेव्हा पुतीनच्यासमोर रशियाचे स्पाय प्रमुख चळाचळा कापायला लागले, बोबडी वळली, काय झालं होतं?

बीड: राष्ट्रवादी भवनचे वीज बिल थकले, महावितरणने कनेक्शन कापले; एक महिन्यापासून राष्ट्रवादी भवनात अंधार..!