नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (7 फेब्रुवारी) राज्याची उपराजधानी नागपूरला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरला अधिवेशन न घेण्यापासून त्यांची लांबलेली नागपूर भेटीसह अनेक गोष्टींवर भाष्य केलं. अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा स्वरुपाच्या बातम्यांवरुनही अजित पवारांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. मध्ये काही बातम्या वाचायला मिळाल्या. यात खरंतर माझीही चूक असल्याचीही कबुली अजित पवारांनी दिली (Ajit Pawar Press Conference in Nagpur comment on GST Corona Vaccination etc).
अजित पवार म्हणाले, “मध्ये बातम्या पण मला अशा वाचायला मिळाल्या. खरंतर यात माझीही चूक आहे. मी माझी चूक नाही असं म्हणणार नाही. माझ्याकडून काही कळण्याआधीच ‘अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं’ अशा बातम्या वाचायला मिळाल्या. वास्तविक मी प्रत्येक विभागाच्या डीपीसीच्या बैठका घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील घेतल्या. सर्वच विभागांमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागे जयंत पाटील देखील अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या परीने काम केलं. मी पण माझ्या परीने काम करतो. आजही मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मिहानबद्दल अलिकडे बैठक झाली नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.”
आपल्याकडे मुक्त प्राणीसंग्रहालय असावं अशी इच्छा होती. तेही झालं. पण, आजच्या घडीला देखील केंद्र सरकारने जे वन नेशन वन टॅक्स ठरवलं होतं, संसदेत शब्द दिला. पण 25 हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. त्याचा परिणाम राज्यातील विकासावर होतोय. आम्हाला पगार तर द्यावाच लागतो, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
Ajit Pawar Press Conference in Nagpur comment on GST Corona Vaccination etc