पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटिशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी वक्तव्य केलं आहे. नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी सकाळपासून पुण्यातील (pune) विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नोटीस आली आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं होतं, त्यावर त्यांनी हा सल्ला दिला. तसेच जनतेला राजकारण्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. त्यांना त्यांच्या भागाचा विकास हवा आहे, असंही अजित पवार म्हणाले. दरम्यान, पोलीस आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन त्यांनी केलेल्या आरोपांची माहिती घेणार आहेत. त्यामुळे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
नोटीसा देण्याची परिस्थिती कधीही नव्हती. या संदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांसमोर याबाबत थोडंबहुत विधान केलं होतं. प्रत्येकानं आपआपलं काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे. यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पदावरील व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, कसं सर्वांना घेऊन गेलं पाहिजे याचा आदर्श घालून दिला आहे. हे सर्व स्तरावर झालं पाहिजे. लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजितबात रस नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
सूसच्या लोकांचे पाणी, वीज, स्मशानभूमी, ड्रेनेजचे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न राहतात बाजूला अन् नोटिसा काढल्या जातात. त्याबाबतची विधाने होतात. यात वेळ घालवला जातो. सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे. विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
Video : 10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 12 March 2022 https://t.co/6ybqqIElEe #Headlines #Tv9Marathi #FastNews #MahaFastNews #SuperFastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2022
संबंधित बातम्या:
दिवसभर घरीच असेल कधीही या, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; पोलीस सागर बंगल्यावर येऊन चौकशी करणार
अजित पवारांच्या 31, चंद्रकांत पाटलांच्या १० कार्यक्रमांचे पुण्यात उद्घाटन