जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. राजेंद्र घाडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. कारखान्याशी संबंधित राजेंद्र घाडगे यांची चौकशी सुरु आहे. हे प्रकरण बंद होण्याच्या टप्प्यामध्ये असल्याने घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. राजेंद्र घाडगे यांना जुन्याच प्रकरणात एसीबीकडून चौकशीचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एसीबीकडून जरंडेश्वर साखर कारखान्याची काही नव्याने चौकशी केली जात नाहीय. एसीबीकडे हे प्रकरण प्रलंबित आहे आणि जुनं प्रकरण आहे. या प्रकरणात अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीने चौकशीला बोलावालेलं होतं आणि 21 तारखेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रक्रियेचा भाग म्हणून एसीबीकडून घाडगे यांची चौकशी केली जात आहे.
राजेंद्र घाडगे हे जरंडेश्वर साखर कारखान्यावर डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. राजेंद्र घाडगे यांना 17 तारखेला समन्स बजावण्यात आलं होतं आणि 21 तारखेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. जरंडेश्वर साखर कारखान्याची नव्याने चौकशी केली जात नसल्याचं स्पष्टीकरण एसीबी अधिकाऱ्यांनी दिलं होतं. त्यानंतर प्रक्रियाचा भाग म्हणून राजेंद्र घाटगे यांची चौकशी केली जात आहे. प्रलंबित असलेलं हे प्रकरण आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सगळा अहवाल तयार करण्यासाठी प्रक्रियेचा भाग म्हणून चौकशी केली जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची नव्याने चौकशी केली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.