Big News Ajit Pawar : यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही, अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा

| Updated on: Mar 24, 2022 | 4:15 PM

प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना (Sugar Factory) टार्गेट करून आरोप करत आहेत. या कारखान्यांना दिलेली कर्ज ही बेकायदेशीर असल्याचा आरोप सतत भाजपकडून होत आहे.

Big News Ajit Pawar : यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही, अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा
साखर कारखान्यांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा
Image Credit source: Vidhansabha
Follow us on

मुंबई : आज विधानसभेत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) सामना होताना दिसून आला. प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना (Sugar Factory) टार्गेट करून आरोप करत आहेत. या कारखान्यांना दिलेली कर्ज ही बेकायदेशीर असल्याचा आरोप सतत भाजपकडून होत आहे. आजही दरेकरांनी यावरून अजित पवारांना सावला केले. दरेकरांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवारानी मोठी घोषणा केलीय. यापुढे कोणत्याही साखर कारण्याला हमी देणार नाही, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच काही कारखाने सरकारने विकत घेतले. त्यातले काही कारखाने बंद आहेत. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढले, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले आहे.

सत्ताधारी आणि विरोधक सर्वांवर कारवाई होणार

तसेच आम्ही भेदभाव करत नाही, एमएससी बॅंकेचा नफा नेट 400 कोटी रूपये आहे. असे सांगतानाच यापुढे कोणत्या्ही कारखान्याला हमी देणार नाही, सत्ताधारी असो किंवा विरोधक त्यांच्यावर कारवाई होणार, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. सर्व प्रकारचे सहकारी नियम पाळूनच कारखान्यांना मदत करण्याचे सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही आज असो अथवा उद्या नसो परंतु सहकारी संस्था कायम स्वरूपी मजबूत राहील्या पाहीजेत, मधल्या काळात सहकारी कारखान्यां संदर्भात आरोप केले गेले, परंतु सहकारी कारखाने चालवायला कोणी पुढे येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावर्षी देशात राज्याने साखरेची विकमी निर्यात केली, आम्ही जे चांगले झाले ते चांगलेच म्हणणार, असेही ते म्हणाले.

अजित पवारांना दरेकरांचं प्रत्युत्तर

अजित पवारांनी सहकार क्षेत्राच दुजाभाव केला जात नाही म्हणताच प्रवीण दरेकरांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सहकारात दुजाभाव होतोय. आमचे गडकरी सांगतात एखाद्याचे वाटोळे करायचे कर त्याला साखर कारखेने चालवायला द्या, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे. तसेच माझ्यावर आरोप झाले की आत्ता प्रसाद लाड यांच्यावर आरोप सुरू आहेत. ते पगारदार नोकर आहेत, अशा प्रकारे एखाद्याला टार्गेट करायचे ठरले आहे. आज प्रसाद लाडांवर तक्रार उद्या अणखी कोणावर करतील असा आरोपही दरेकारांनी यावेळी केला आहे. मुंबई बँके प्रकरणावर जेव्हा राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला. तेव्हापासून प्रवीण दरेकर कारखान्यांचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारला घेण्याच्या प्रयत्न करत आहेत.

Dhananjay Munde : ह्याची आमदारकी पण रद्द होते, करुणा शर्माच्या बॉलींगवर निलेश राणेंचा सिक्सर

योगींच्या शपथविधीचा मंच सजला, सोनिया गांधींपासून ते अंबानींपर्यंत, शपथविधीला कुणा कुणाला निमंत्रणं?

Aurangabad | शेंद्रा MIDC चा प्लॉट निविदेविनाच मंजूर, उद्योगमंत्री सुभाष देसाईंना खंडपीठाचे काय आदेश?