पिंपरी चिंचवड : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाले आहे. त्यामध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांच्या पत्नीला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना काटे ( Nana Kate ) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे. तर दुसरिकडे महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे ( Rahul Kalate ) यांनीही अपक्ष अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची अर्थातच अजित पवार ( Ajit Pawar ) यांची डोकेदुखी वाढणार आहे.
भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असतांना पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा कोणता पक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच ही जागा मिळेल हे जवळपास निश्चित होते.
2019 च्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेकडून बंडखोरी केलेले उमेदवार राहुल कलाटे यांना मिळाली होती, त्यामुळे या जागेवर शिवसेनेकडूनही दावा केला जात होता.
अखेर याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ते निवडणूक लढणार आहे. तर राहुल कलाटे यांना उमेदवारी नाकारली आहे.
चिंचवड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयात उमेदवार नको, आयात उमेदवार दिल्यास पक्षाचे काम करणार नाही अशी भूमिका घेतली होती, त्यामुळे राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याने नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राहुल कलाटे मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे.
अजित पवार यांच्याकडून राहुल कलाटे की नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यात नाना काटे यांचे नाव निश्चित झाल्याने राहुल कलाटे हे अपक्ष निवडणूक लढवून महाविकास आघाडीत बंडखोरी करणार आहे.
राहुल कलाटे यांना यापूर्वीच्या निवडणुकीत मिळालेली मते पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच याचा फटका बसणार आहे. कलाटे हे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुकही होते. त्यामुळे राहुल कलाटे यांची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी अडचण ठरू शकते.