Palghar Heavy Rain: पालघर मध्ये पावसाचा कहर! अनेक गावांचा संपर्क तुटला; जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटट्ही जाहीर

| Updated on: Jul 13, 2022 | 5:58 PM

पालघर जिल्हयातील वसई विरार शहर महानगरपालिकासह सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असेही या आदेशात म्हंटले आहे.

Palghar Heavy Rain: पालघर मध्ये पावसाचा कहर! अनेक गावांचा संपर्क तुटला; जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटट्ही जाहीर
Follow us on

पालघर : पालघर मध्ये पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस(Palghar Heavy Rain) पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पालघर जिल्ह्यात पुर स्थिती निर्माणा झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. गुरुवारी(14 जुलै) देखील पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष माणिक गुरसळ यांनी उद्या 14 जुलै सर्व माध्यमिक शाळा(schools) आणि महाविद्यालय(colleges ) यांना सुट्टी(holiday) जाहीर केली आहे. तसेच नागरीकांना खबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर विभागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन, संपूर्ण जिल्हयाकरिता अथवा जिल्हयातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. जिल्हयामध्ये सद्यस्थितीमध्ये मुसळधार पाऊस होत असून तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14 जुलै पर्यंत पालघर जिल्हयाला अति मुसळधार पावसाचा (Extremely Heavy Rainfall) इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी 14 जुलै पर्यंत जिल्हयातील सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केल्याचे परिपत्रक जारी केले आहे.

पालघर जिल्हयातील वसई विरार शहर महानगरपालिकासह सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असेही या आदेशात म्हंटले आहे.

या आदेशाची प्रत पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर, वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त, पालघर पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.

पालघरमध्ये धो-धो पाऊस, विद्यार्थ्यांचे हाल, नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

पालघर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. नदी आणि धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून प्रशासनाकडून मासेमारी करीत नदी पात्रात न उतरण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे. जव्हार ,मोखाडा , विक्रमगड आणि वाडा इत्यादी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून डहाणू तालुक्याचे 72.92 तर तलासरी तालुक्यात 22.65 मी.मि पाऊसच झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 33.13 मी .मि पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पालघरमध्ये नदीच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

वांगणी इथल्या वाघ नदीला मोठा पूर

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जव्हार-मोखाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर वावर वांगणी इथल्या वाघ नदीला मोठा पूर आला आहे. इथल्या आठ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.