अमरावती: शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने 15 ते20 रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाल्या. त्यामुळे अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली. समान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृहाजवळून सायरन वाजत 15 ते 20 रुग्णवाहिका हिंदू स्मशानभूमीकडे जात होत्या. सायरनचा जोरदार आवाज करीत या रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भूतवश्वर चौक येथून हिंदू समशानभूमीकडे निघाल्या. इतक्या रुग्णवाहिका निघाल्याचे पाहून नागरिक चांगले धास्तावले होते. एकदम इतक्या संख्येंने रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे जात असल्यानं अमरावतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. कोरोनाची तिसरी लाट अमरावतीत सुरु झाल्याच्या चर्चा असतानाच रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाल्यानं अमरावतीकरांमध्ये खळबळ माजली होती. (Amaravati Ambulance drivers organised march for tribute their colleague who died due to corona )
शहरातील एका रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाली. यावेळी त्याच्या सहकारी रुग्णवाहिका चालकांनी त्याच्या अंत्ययात्रेत रुग्णवाहिका नेऊन सहभाग घेतला. आपल्या सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना अनेक रुग्णवाहिका चलक सायरन वाजवत निघाल्याने अमरावतीकरांमध्ये दहशत निर्माण झाली.
रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवणे बेकायदेशीर असताना ऐन कोरोनाकाळात सायरन वाजवत 15 ते 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाल्याने अमरावतीमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत रुग्णवाहिका चालकांशी संपर्क केला असता त्यांनी आमच्या सहकाऱ्याचा कोरोनानं मृत्यू झाला. त्याला आम्ही अशा प्रकारे श्रद्धांजली दिली अशी माहिती रुग्णवाहिका चालकांनी दिली.
अमरावतीमध्ये कोरोनाची तिसरी लाट?
अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट झाला. दर 1.41 मिनिटाला एक रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झालेला आहे. दर दोन तासांत एका बाधिताचा मृत्यू झाल्याने ही बाब अमरावती मधील नागरिकासांठी काळजी वाढवणारी ठरली. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरुवात झाली होती.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात दिसून आलं. फेब्रुवारीमध्ये 12230 कोरोना रुग्ण आढळले त्यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मार्च महिन्यात 12518 आढळले त्यापैकी 164 रुगणांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात 16689 रुग्ण आढळले आणि 410 रुग्णांचा जीव गेला. मे महिन्यातील
1 मे ते 17 मे पर्यंत 18020 रुग्ण आढळले असून 313 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही; संभाजीराजे संतापले https://t.co/W5dCO8YpbZ @YuvrajSambhaji #MarathaReservation #BJP #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
इतर बातम्या:
Sunday special story | 2020 मध्ये व्हायरल झालेले ‘हे’ व्हिडीओ पाहिलेत का?, बघा स्पेशल 10 व्हिडीओ
Maratha Reservation: पंतप्रधान मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही; संभाजीराजे संतापले
(Amaravati Ambulance drivers organised march for tribute their colleague who died due to corona )