अमरावती: कोरोना लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने अनेक गोर गरीब वीज बिल भरू शकले नाहीत. हातावर पोट असणाऱ्या लोकांना एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागला. आता हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. मात्र,आता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी वीज बिल भरण्यासाठी घरी जाऊन वीज बिल भरले नसेल तर वीज कनेक्शन कट करत आहेत. मात्र, वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे आता आमच्या गळ्यातील मंगळसूत्र घ्या व ते गहाण ठेवा व तुम्ही त्या पैशातून वीज बिल भरा, अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील महिलांनी केली. तिवसा विज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता राजेश पाटील यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. संतप्त महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात मंगळसूत्र घेऊन आंदोलन केल्यानं खळबळ उडाली होती. (Amaravati Electricity Bill issue woman’s reached at Mahadiscom office giving Mangal sutra for paying bills)
विधानसभेत अधिवेशनाच्या अखरेच्या दिवशी वीज तोडणीवरील बंदी उठवली गेली. महावितरण कंपनीद्वारे त्यानंतर थकीत वीज बिल ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करत आहे. मात्र, अद्यापही कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे रुळावर न आल्याने गोरगरीब नागरिकांची परिस्थिती गंभीर आहे, तालुक्यातील मोझरीत मागासवर्गीय वस्तीत वीज बिल कट करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी धमक्या देत असून ते बिलात टप्पे पाडून देत नसल्याचा आरोप आंदोलन कर्त्या महिलांनी केला.
तिवसा तालुक्यातील महिलांनी महावितरण कंपनी कार्यालयात धडक दिली. त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून चक्क वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता राजेश पाटील यांच्या टेबलावर ठेवले. हे मंगळसूत्र तुम्ही घ्या व सोनाराकडे गहाण ठेवा, असे महिलांनी सांगितले. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने महावितरणच्या कार्यालयात खळबळ माजली होती. स्थानिक युवा संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. अशी माहिती जसबीर ठाकूर यांनी दिली.
राज्यातील वीज बिलाचा प्रश्न गंभीर होत असल्याचं दिसत आहे. एकीकडे महावितरणकडून वीज कनेक्शन तोडली जात आहेत. तर दुसरीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या वीज ग्राहकांपुढं वीज बिल कसं भरायचं हा सवाल उभा राहिलाय. अमरावती जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही.
ATM मध्ये पैसे विसरुन आल्यावर काय करायचं? तुमच्या पैशाचं काय होतं?https://t.co/U7Adyr1vyw#atm | #bank | #cashwithdrawal | #money
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या
Amravati Lockdown | अमरावतीत पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’चे संकेत, यशोमती ठाकूर यांचे सूतोवाच
अमरावती शहरातील बाजारपेठा ‘या’ वेळेत राहणार बंद, व्यापारी असोसिशनचा निर्णय
(Amaravati Electricity Bill issue woman’s reached at Mahadiscom office giving Mangal Sutra for paying bills)