कोल्हापूर : घटस्थापनेला राज्यातील सर्व मंदिरं सुरु करण्यात आली आहे. कोल्हापुरातील अंबाबाईचं मंदिरही गुरुवारी सुरु करण्यात आलं. कोरोना नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. अशावेळी अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आल्यानं एकच खळबळ उडाली होती. अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन पणजी कंट्रोल रुमला आला. त्यानंतर मंदिर परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा मंदिर परिसरात कुठलाही बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ सापडला नाही. दरम्यान, या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. (Anonymous phone call of bomb placed in the Ambabai temple, Kolhapur police arrested Two accused )
अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा निनावी फोन करणारे आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे असे या आरोपींची नावं आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही आरोपी सासरा आणि जावई आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे दोन्ही आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावचे रहिवासी आहेत. जावयाने सासऱ्याचा फोन वापरुन अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन केला होता. दारुच्या नशेत जावयाने फोन केल्याचा दावा सासऱ्यांनी केलाय.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अखेर हा फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर आता भाविकांसाठी मंदिर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं.
साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचे पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने घटस्थापना झाली आहे. मंदिर समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी ही तोफ दिली. या सलामीनंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला सुरवात होते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुहूर्ताने अंबाबाई मंदिरात घटस्थापना केली जाते. मंदिरात घटस्थापना झाल्याचा संदेश करवीरवासियांना मिळावा यासाठी तोफेची सलामी देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली जाते. अंबाबाई मंदिरातील या तोफेच्या सलामीने नंतरच भाविक आपल्या घरांमध्ये घटाची स्थापना करत असतात.
इतर बातम्या :
Photo : दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी, दादांनी थेट सॅल्यूटच ठोकला!
‘माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस
Anonymous phone call of bomb placed in the Ambabai temple, Kolhapur police arrested Two accused