दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या दाव्यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यावर शिवसेनेने थेट विरोध दर्शविला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची भूमिका वेगळी असल्याचे जाहिर केले आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मतभेद असल्याचे उघड झाले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे कधीच धर्मवीर नव्हते ते सराज्यरक्षक होते असे म्हंटले होते, त्यावरून संपूर्ण राज्यात अजित पवार यांच्या या विधानावरून भाजप आणि शिंदे गटाने आंदोलन सुरू केले आहे. राज्यभर अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केले जात असतांना त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोलत असतांना औरंगजेब हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हता असे म्हंटले आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानावर बोलत असतांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे, औरंगजेब हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हताच असे आव्हाड यांनी एक संदर्भ देतांना म्हंटलं आहे.
त्याच विधानावरून ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाला विरोध दर्शविला आहे.
अंबादास दानवे यांनी आव्हाड यांचा विरोध करत असतांना औरंगजेब हा क्रूरच होता आणि हिंदू द्वेष्टा होता, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार वेगळेच आहेत असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबादमध्ये बोलत असतांना अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेला थेट ठाकरे गटाने विरोध दर्शविला आहे.