‘वाचाल तर टिकाल’ या शिकवणीनुसार विद्यार्थी आणि युवकांचं अनोख्या पद्धतीनं अभिवादन

| Updated on: Apr 16, 2023 | 10:39 AM

इस्लामपूर शहरात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इस्लामपूर यांच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाचाल तर टिकाल या शिकवणीनुसार विद्यार्थी आणि युवकांचं अनोख्या पद्धतीनं अभिवादन
AMBEDKAR JAYANTI 2023
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar jayanti 2023) यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनव पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शालेय विद्यार्थी, युवकांनी 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांच्या ‘वाचाल तर टिकाल’ या शिकवणीनुसार अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. राज्यात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर (social media viral video) आंबेडर जयंती उत्सवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

इस्लामपूर शहरात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इस्लामपूर यांच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या विविध उपक्रमांतर्गत विजयंता अकॅडमीच्या हॉलमध्ये 58 विद्यार्थी व युवकांनी एकत्रित येवून 18 तास अभ्यास करत अनोखे अभिवादन केले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशाल सुर्यगंध, सचिन कांबळे, सिध्दार्थ कांबळे,जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धीरज कांबळे, उपाध्यक्ष शोधीत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाचन उपक्रमातील सहभागी वाचकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

आंबेडकर जयंतीच्यानिमित्ताने राज्यभरात चांगले उपक्रम राबविले जातात. त्याबरोबर आंबेडकरांचा संघर्ष विद्यार्थ्यांना सांगितला जातो. अनुयायी त्या दिवशी चांगल्या कार्यक्रमांचे नियोजन करतात. राज्यात यावर्षी सुध्दा उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. पुण्यात अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.  त्याचबरोबर मुंबई सारख्या शहरात वाजत-गाजत आंबेडकर जयंती साजरी केली.  आंबेडकर जयंतीचे अजूनही काही कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरु आहेत. रविवारपर्यंत कार्यक्रम सुरु राहणार आहेत.