पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात चिंता वाढली आहे. रोज हजारो नवे रुग्ण वाढत असल्यामुले आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतो आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विदर्भाच्या ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. “मी गडकरींशी बोललो, ते म्हणाले विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असं अजित पवार म्हणाले. पुण्यात अजित पवरांच्या उपस्थितीत आज (24 एप्रिल) कोरोनासंबंधी आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, तसेच अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (amid Corona pandemic Nitin Gadkari taken responsibility of Oxygen supply for Vidarbha region information given by Ajit Pawar)
सध्या देशासह महाराष्ट्रातसुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. याच कारणावरुन राज्यात विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. कोरोनाला थोपवण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, विरोधकांकडू सातत्याने टीका होत असूनसुद्धा ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.
यामध्ये विदर्भातील ऑक्सिजन पुरवठ्याकडे आम्ही लक्ष देतो असे, आश्वसन नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिले. तशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना “सध्या रेमडेसिव्हीरच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र आगामी दोन-तीन दिवसांत औषध कंपन्या इंजेक्शन प्राधान्याने देतील असं सांगितलं. पण केंद्राने पुन्हा त्यांचा ताबा घेतला आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल मी गडकरींशी बोललो. यावेळी बोलताना विदर्भातील ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असे गडकरी यांनी सांगतिलं. असं जर वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही,” असं अजित पवार म्हणाले.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याचे जाहीर केले होते. सध्याची परिस्थिती पाहून गडकरी यांनी व्हेंटिलेटर्सच्या पुरवठ्यासाठी स्वत:हून पढाकार घेतला होता.
महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर चर्चा सुरु आहे. पुण्यात तर कोरोना संसर्गाची परिस्थिती जास्तच गंभीर आहे. याच कारणामुळे कोरोना संसर्ग, ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा यावर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी पुण्यात बैठक बोलावली होती. या बौठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट हे उपस्थित होते. या बैठकीत पुण्याची कोरोनास्थिती तसेच इतर बाबींवर चर्चा झाली.
इतर बातम्या :
महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळण्याची चिन्हं, अजित पवारांचे संकेत, ग्लोबल टेंडर काढणार
सर्दी, खोकला आणि ताप, कोरोनाची लक्षणे, पण RTPCR चा रिपोर्ट निगेटिव्ह, खासदार प्रीतम मुंडे क्वारंटाईन
(amid Corona pandemic Nitin Gadkari taken responsibility of Oxygen supply for Vidarbha region information given by Ajit Pawar)