इंदिरा गांधी स्वर्गातून खाली आल्या तरी कलम 370 पुन्हा येणार नाही, अमित शाह यांची डरकाळी

| Updated on: Nov 13, 2024 | 6:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली आहेत. राम मंदिर बांधणार असे पंतप्रधान म्हणाले होते आणि त्यांनी ते करुन दाखविले असे गृहमंत्री अमित शाह यांनी धुळ्यातील सिद्धखेडा येथील प्रचार सभेत सांगितले.

इंदिरा गांधी स्वर्गातून खाली आल्या तरी कलम 370 पुन्हा येणार नाही, अमित शाह यांची डरकाळी
अमित शाह, नेते, भाजप
Follow us on

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालेले आहे. अमित शाह यांची धुळ्यातील सिंदखेडा राजा येथे मोठी सभा झाली आहे. या प्रचार सभेत अमित शाह यांनी कॉंग्रेसला पुन्हा काश्मीरमध्ये आर्टीकल 370 आणायचे आहे. परंतू कोणत्याही किंमतीत जम्मूत काश्मीरात आर्टीकल 370 लागू होणार नाही. राहूल गांधीच काय तर इंदिरा गांधी जरी स्वर्गातून खाली आल्या तरीही जम्मू-कश्मीरात आर्टीकल 370 काही केल्या परत येणार नाही अशी डरकाळीच गृहमंत्री अमित शाह यांनी फोडली आहे.

जम्मू – काश्मीरमध्ये नव्या सरकारच्या स्थापने नंतर आर्टीकल 370 वरुन पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीर उमर अब्दुल्ला सरकार वारंवार जम्मू -काश्मीरात आर्टीकल 370 आणणारच असे म्हणत आहे. या मुद्द्यावर जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत अनेकदा तणावाची स्थिती तयार झालेली आहे. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे.

धुळ्यातील सिंदखेडा राजा येथील निवडणूक रॅलीत संबोधित करताना गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की कोणत्याही किंमतीवर जम्मू – काश्मिरात आर्टीकल 370 परत येणार नाही. ते पुढे म्हणाले की,’महायुतीचा अर्थ ‘विकास’ आणि आघाडीचा अर्थ ‘विनाश’. आपल्याला हे ठरावयाचं आहे की विकास करणाऱ्यांना सत्तेत आणायचे की विनाश करणाऱ्यांना.’

हे सुद्धा वाचा

तिसरे क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था

माजी पीएम मनमोहन सिंह यांच्या टीका करताना अमित शाह म्हणाले की पीएम मोदी यांनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनविले आहे. मनमोहन सिंह यांच्या काळात भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या यादीत 11 व्या स्थानावर होता. परंतू नरेंद्र मोदींनी देशाला पाचव्या स्थानावर आणले आहे. साल 2027 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.आघाडी खोटे वादे करीत आले आहेत अशी टीका शाह केली आहे.

370 कलम परत आणायच्या वल्गना

अमित शाह यावेळी म्हणाले की राहुल गांधी जम्मू – कश्मीरात आर्टीकल 370 परत आणण्याचे म्हणत आहेत. परंतू राहुलच काय इंदिरा गांधी जरी स्वर्गातून खाली उतरल्या तरी जम्मू-कश्मीरात आर्टीकल 370 पुन्हा येणार नाही.

पीएम मोदी यांचे वचन म्हणजे दगडावरची काळी रेघ

अलिकडे कॉंग्रेसचे अध्यक्षांनी म्हटले होते की केवळ अशी आश्वासने दिली पाहीजेत जी पूर्ण करता येतील. कर्नाटक, हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसची सरकारने आपली दिलेली वचने पूर्ण करु शकली नाहीत. परंतू मोदी यांनी दिलेली वचने ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहेत. आम्ही वचन दिले होते की राम मंदिर बनविणार आणि बनविले. राहुल बाबा आणि सुप्रिया सुळे व्होट बॅंकेच्या कारणाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात सामील झाले नाहीत. 550 वर्षांत प्रथमच अयोध्येत रामलल्लाने दिवाळी साजरी केली असेही शाह यांनी सांगितले.