अकोला : विधानसभेच्या निवडणुकीवरून राज्याचे राजकारण प्रचंड तापले आहे. नागपूर आणि नाशिकच्या जागेवरुन कोण बरोबर आणि कोण चुक याची गोळाबेरीज मांडली जात आहेत. त्यातच अमरावती पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रणजित पाटील यांच्या पराभवामुळे राजकारण कसे केले गेले आहे, त्याची माहिती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी सांगितले आहे. आमदार अमोल मिठकरी यांनी राजकारणाची दुसरी बाजू सांगताना त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावरच आरोप केला आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अकोल्यातील भाजपच्या अदृश्य शक्तीने (नेत्यांनी) मोठी मदत केली आहे, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानत असल्याचे अमोल मिठकरी यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी सांगितले की, पक्षांतर्गत असलेल्या नाराजीमूळ आज रणजीत पाटील यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या अदृश्य शक्तींचा मोठा हात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
तर राज्यात भाजपला मिळालेला पराभव पाहत असताना आता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.
तसेच पोटनिवडणुकीसाठीही ती निवडणूक बिनविरोध घ्यावी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रडत आहेत असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
जर भविष्यात पूर्ण निवडणूक बॅलेट पेपरद्वारा घेतल्या गेल्या तर भाजपच विषारी रोपटं पूर्णतः नष्ट होऊन जाईल असा खरमरीत टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या पदवीधर निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना सांगितले की, त्या ठिकाणी फक्त देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक हरल्याचे चित्र उभा केले जाते आहे. मात्र त्या ठिकाणी भाजप जर पूर्ण ताकदीनिशी उतरली असती तर तिथे भाजपचाच विजय झाला असता असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर अमोल मिठकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे त्यांनी बॅलेट पेपरची मागणी केली आहे.